real estate supplyment lekh
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:17+5:302021-06-05T04:09:17+5:30
– आर्किटेक्ट मनीषा फडके ...................................... आर्किटेक्ट हे डिझाइनर असतात आणि समाजात होत असलेल्या वास्तविक नवकल्पनांना मदत करू शकतात. आमचा ...
– आर्किटेक्ट मनीषा फडके
......................................
आर्किटेक्ट हे डिझाइनर असतात आणि समाजात होत असलेल्या वास्तविक नवकल्पनांना मदत करू शकतात. आमचा समुदाय, शहर आणि अवतीभोवतीच्या प्रदेशास निसर्गरम्य स्थान बनविण्याच्या दृष्टीने आणि विचाराने कायम कार्यरत असतात. तर अशाच कल्पकतेतून, आयआयए पीसीसीचे अध्यक्ष आर्किटेक्ट शशांक फडके यांच्या मार्गदर्शखाली मेकिंग ऑफ वरदान्त स्पेस या संकल्पनेचा जन्म झाला.
बिजलीनगर पुलाजवळ सकाळी वॉक करताना रस्त्याच्या कोपऱ्याचा वापर हा तुटलेली वाहने व भंगार सामान म्हणून केला जातो. याकडे बघताना कायम वाटायचे की या जागेस सुशोभित करण्याची गरज आहे आणि जेव्हा असा एक चांगला उपक्रम राबवण्याचा आयआयएने निर्णय घेतला, असे आर्किटेक्ट अनुराधा गोवर्धन म्हणाल्या.
"काही दुर्लक्षित आरक्षणाच्या भूखंडाची विशिष्ट पार्क किंवा लोकांना चालण्यासाठी आणि बसण्यासाठी ग्रीन स्पेस म्हणून डिझाइन केली जाऊ शकते.", आर्किटेक्टअनुपमा शेठ यांनी प्रस्तावना मांडली.
आर्किटेक्ट सागर तिवारी म्हणाले की, वरदान्त स्पेसच्या संकल्पनेमुळे न्यूयॉर्कचा हाय लाईन प्रकल्प त्यांच्या मनात आला आहे. तिथे या प्रकारचा एका गटाने बंद असलेल्या रेल्वे ट्रॅकचे रूपांतर एका सुंदर सार्वजनिक बागेमध्ये केला. आता ही जागा शहरातील सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी जागा बनली आहे.
आर्किटेक्ट म्हणून आम्ही फक्त रेखांकने करून थांबत नाही तर कल्पना अंमलात आलेल्या पाहण्याचा दृढनिश्चय करतो. यासाठी आजूबाजूच्या समुदायांना सामील करून घेणे आणि अशा वरदान्त स्पेसेसच्या मालकीची भावना निर्माण करणे फार महत्वाचे आहे, असे आर्किटेक्ट किरण कलामदानी यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवडमधील आर्किटेक्टच्या गटाने एकत्र येऊन न वापरलेले, उपेक्षित आणि संभाव्य छोट्या छोट्या जागा ओळखून त्या हिरव्यागार करण्याचा निर्णय घेतला आहे. मग ती रस्त्याच्या कोपऱ्यावरील अतिरिक्त जागा असो किंवा घरे किंवा रस्त्याजवळ फक्त एक लहान नगण्य जागा असो. त्या जागांमध्ये स्थानिकांच्या मदतीने या स्पॉट्सचे पॉकेट पार्क किंवा छोट्या हिरव्यागार भागात रूपांतर करणे सहज शक्य आहे. समुदायाची सामिलता आणि थोडासा वेळ देण्याची इच्छा यामुळे क्षेत्राची देखभाल करण्यास मदत होऊ शकते. तसेच सर्वांना मी आवाहन करते की, पक्षी आणि फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी आणि पर्यावरणात समतोल निर्माण करण्यास मदत करणाऱ्या मूळ वनस्पतीचा वापर करा. सर्वांना माझी विनंती अशी आहे की, आजूबाजूला, सभोवताली फिरा आणि लहान दुर्लक्षित क्षेत्र शोधा आणि आमच्या संस्थेकडे संपर्क साधा. आम्ही त्यांना हिरव्यागार बनविण्यास मदत करू. कृपया तरुण आणि ज्येष्ठांनी पुढे यावे आणि या लहान जागा आनंदी आणि हिरव्यागार बनवण्यास आम्हा आर्किटेक्टसला मदत करावी.