सामाजिक प्रबोधन करणे हीच खरी ईश्वरसेवा- महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:24 AM2018-10-29T02:24:47+5:302018-10-29T02:25:05+5:30
अखंड मौन नामसप्ताह सांगता समारंभ
पाटेठाण : धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून होणारे सामाजिक प्रबोधन हीच खरी ईश्वरसेवा आहे. मौन नामसप्ताहातून होणारी कार्यसिद्धी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पाटेठाण (ता. दौंड) येथे परमपूज्य सद्गुरू सुमंत बापू हंबीर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वव्यापी मानवधर्म आश्रम संस्थेच्या वतीने अखंड मौन नामसप्ताहाचे आयोजन केले होते. त्याच्या सांगता समारंभात जानकर बोलत होते. मंत्री जानकर पुढे म्हणाले की, ‘सामाजिक, राजकीय क्षेत्रात धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचे असून नामस्मरणच्या माध्यमातून शारीरिक तजेलता येण्यास निश्चितच मदत होते.’ माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी आत्मिक समाधान, शारीरिक सृदृढता लाभण्यासाठी नामस्मरण गरजेचे असल्याचे सांगितले.