व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:51 PM2018-03-24T15:51:34+5:302018-03-24T15:51:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि  जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले.

Really good days for cartoons : Vaijnath Dulange | व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदर्शन रविवार २५ मार्च सकाळी १० ते ९ पर्यंत सुरु

पुणे : व्यंगचित्र हा एक आरसा असतो, समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब त्यात पडत असते. व्यंगचित्र याच्या किंवा त्याच्या विरोधात असतात असे समजता कामा नये . सध्याची परिस्थिती पाहता व्यंगचित्रकलेला खरेखुरे  'अच्छे  दिन ' येताना दिसत आहेत ' असे प्रतिपादन प्रसिद्ध व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले.त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, अण्णा थोरात, नगरसेवक  रवींद्र माळवदकर, काका चव्हाण, नगरसेविका अश्विनी कदम, अशोक राठी आदी राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी तसेच व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, घनश्याम देशमुख, चित्रपट निर्माते निलेश नवलखा तसेच मिस गुजरात सिध्दी त्रिवेदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात वैजनाथ दुलंगे, प्रदीप म्हापसेकर,आलोक निरंतर, राजेंद्र सरग , कपिल घोलप, धनराज गरड,अतुल पुरंदरे, शरयू परतांडे, योगेंद्र भगत, संजय मोरे, रणजीत देवकुळे, भटू बागले, गौरव यादव, लहू काळे, यांच्यासह अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत.
हे प्रदर्शन रविवार २५ मार्च सकाळी १० ते ९ पर्यंत सुरु राहणार आहे. योगेश कुचेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Really good days for cartoons : Vaijnath Dulange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.