Pune | वेल्ह्यातील निर्घृण खुनाचे कारण उघड; गोळ्या झाडून, धारदार चाकूने चेहऱ्यावर वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 05:35 PM2023-03-07T17:35:42+5:302023-03-07T17:37:22+5:30

एका युवकाचा गोळ्या झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करून खून...

reason for the gruesome murder in Velhya revealed; Killed by shooting, stabbing the face with a sharp knife | Pune | वेल्ह्यातील निर्घृण खुनाचे कारण उघड; गोळ्या झाडून, धारदार चाकूने चेहऱ्यावर वार करून खून

Pune | वेल्ह्यातील निर्घृण खुनाचे कारण उघड; गोळ्या झाडून, धारदार चाकूने चेहऱ्यावर वार करून खून

googlenewsNext

वेल्हे (पुणे) : जमिनीच्या वादातून वेल्ह्यात एका युवकाचा गोळ्या झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करून खून झाला. याबाबतची तक्रार वेल्हे पोलिसात सुरेश नामदेव रेणुसे (वय ४५, रा. पाबे, ता. वेल्हे) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल दिनांक ६ मार्च रोजी १२.१० च्या सुमारास वेल्हे येथील हॉटेल विशाल येथे नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे (वय ३८, रा. पाबे, ता. वेल्हे) वर गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी वार केले. ज्ञानेश्वर उर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे याने सात ते आठ वर्षांपूर्वी मरळ आवाडातील जमीन खरेदी केली होती व तीच जमीन परत माऊली रेणुसे याने खरेदी केली होती व त्या जमिनीबाबत पहिल्या पार्टीची कोर्टात केस चालू होती.

या जमिनीबाबत मयत नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे हा मरळ आवाडातील लोकांना आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली लक्ष्मण रेणुसेविरुद्ध लोकांना एकाचे दोन सांगत आहे. असा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून आरोपी ज्ञानेश्वर रेणुसे याने त्याच्या चार साथीदारांसह नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे याच्यावर पिस्टलमधून गोळ्या झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करून खून केला.

अपर पोलिस अधीक्षक नितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर यांनी भेटी दिल्या आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.

Web Title: reason for the gruesome murder in Velhya revealed; Killed by shooting, stabbing the face with a sharp knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.