​​​​​​​'मेट्रो'च्या स्थानकांचा पादचाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 01:10 PM2019-09-17T13:10:42+5:302019-09-17T13:14:10+5:30

प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकांमधून पादचाऱ्यांना रस्ता विनासायास ओलांडता येईल...

Reassure for pedestrians of metro stations | ​​​​​​​'मेट्रो'च्या स्थानकांचा पादचाऱ्यांना दिलासा

​​​​​​​'मेट्रो'च्या स्थानकांचा पादचाऱ्यांना दिलासा

Next
ठळक मुद्देरस्ता ओलांडता येणार: मेट्रो चा वापर करण्याची सक्ती नाहीमेट्रोच्या काही स्थानकांमध्ये दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक दुकानेहीएसएनडीटी महाविद्यालयासमोरचा बराच जुना असलेला स्काय वॉकही पाडण्यात येणार

पुणे : भरधाव जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना येणारी अडचण आता किमान मेट्रो मार्गावर तरी दूर होणार आहे. प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकांमधून पादचाऱ्यांना रस्ता विनासायास ओलांडता येईल. त्यासाठी त्यांनी मेट्रोचा वापर केलाच पाहिजे असे बंधन नाही. 
वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे दोन मेट्रो मार्ग आहे. यातील पौंड रस्ता, कर्वे रस्ता, महापालिका मार्ग व पुढे येरवडा वगैरे ठिकाणी रस्ता ओलांडणे हे पादचाऱ्यांसाठी दिव्य ठरले आहे. पालिकेने काही ठिकाणी स्काय वॉक म्हणजे रस्त्याच्या वर पादचारी उड्डाणपूल बांधून नागरिकांची सोय केली आहे. मात्र त्यासाठी या पुलांवर चढणे, उतरण्याचे दिव्य करावे लागते. त्यामुळे बरेचजण जीव मुठीत धरून कसातरी रस्ता ओलांडत असतात.
अशा सर्वांना किमान मेट्रो मार्गावर तरी आता दिलासा मिळेल. दर एक किलोमीटर अंतरावर मेट्रोचे स्थानक आहे. या स्थानकामध्ये चढण्याउतरण्यासाठी नेहमीचा जीना, सरकता जीना तसेच लिफ्ट अशा तीन सुविधा करण्यात येणार आहेत. त्यांचा मुक्त वापर नागरिकांना करता येणार आहे. रस्ता ओलांडण्यासाठी म्हणूनच ही सुविधा विनामुल्य ठेवण्यात आली आहे. मेट्रो वापरत असाल तरच स्थानकात यायचे, अन्यथा नाही असे कसलेही बंधन महामेट्रोने ठेवलेले नाही. 
प्रत्येक स्थानक दोन मजली आहे. एकदम वरच्या मजल्यावर फलाट असून तिथून थेट मेट्रोत जाता येईल. त्याखालचा मजला मात्र सर्वांसाठी खुला असणार आहे. वृद्धांसह कोणीही नागरिक रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून मेट्रो स्थानकातील या सुविधेचा वापर करू शकतो. त्यामुळेच आता एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा बराच जुना असलेला स्काय वॉकही पाडण्यात येणार आहे असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------
मेट्रोच्या काही स्थानकांमध्ये दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक दुकानेही असतील. त्याचाही नागरिकांना तसेच दुकानदारांनाही फायदा होणार आहे. फक्त रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून स्थानकात आलेल्या नागरिकांना स्थानकाच्या दुसºया मजल्यावर, म्हणजे मेट्रो सुरू होते त्या मजल्यावर मात्र जाता येणार नाही. 

Web Title: Reassure for pedestrians of metro stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.