महावितरण पुणे कार्यालयाकडे ३८ हजार मीटर प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:00+5:302021-03-22T04:11:00+5:30
पुणे : महावितरणतर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीज कनेक्शन दिले जात असल्याने, महावितरण पुणेने मागणी ...
पुणे : महावितरणतर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीज कनेक्शन दिले जात असल्याने, महावितरण पुणेने मागणी केल्यानुसार, सध्या पुणे कार्यालयाकडे ३८ हजार ७०४ वीज मीटर प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे वीज मीटरचा तुटवडा भासणार नाही असा दावा महावितरणने केला आहे़
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे नवीन वीज मीटरची उपलब्धता कमी झाली होती. परिणामी वीज ग्राहकांना खुल्या बाजारातून सिंगल फेज आणि थ्री फेज वीज मीटर खरेदी करावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर १९ लाख ७० हजार नवीन वीज मीटरकतिरा महावितरणने निविदा प्रक्रिया राबविली होती़ याव्दारे पुरवठादार ठेकेदाराकडून सध्या महावितरणकडे १ लाख ४४ हजार ९०४ वीज मीटर उपलब्ध झाले असून, मार्च अखेरीस आणखी सिंगल फेजचे ३ लाख २० हजार आणि थ्री फेजचे ६० हजार नवीन वीज मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वीज मीटरचा तुटवडा भासणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे़