शिरुरमध्ये उच्चांकी लसीकरण करणाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:16+5:302021-09-24T04:13:16+5:30

कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शिरुर तालुक्यातील सर्व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्रे व ३ ग्रामीण ...

Reception of high vaccinators in Shirur | शिरुरमध्ये उच्चांकी लसीकरण करणाऱ्यांचा सत्कार

शिरुरमध्ये उच्चांकी लसीकरण करणाऱ्यांचा सत्कार

Next

कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शिरुर तालुक्यातील सर्व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्रे व ३ ग्रामीण रुग्णालयांमध्ये फिरुन चार दिवसांत एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतला. यात तालुक्यात उच्चांकी ६६ टक्के लसीकरणात प्रथम क्रमांक पटकावला तो केंदूरच्या प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. माया पवार यांनी.

त्यांनी कार्यक्षेत्रातील एकूण १४ गावांमधील एकूण ५४ हजार लोकसंख्येपैकी ३६ हजार जनतेपर्यंत लसीेकरण पोहोचवून यशस्वी केले. याच निमित्ताने संघटनेचे महाराष्ट्र प्रांत महसूल समिती प्रमुख रमेश टाकळकर यांच्या हस्ते त्यांना प्रेरणापत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्य देवेंद्र सासवडे, सचिव संतोष शिर्के, पंडित मासळकर, पर्वतराज नानगे, अशोक मोरे, दत्ता ननवरे आदींसह सर्व आरोग्य कर्मचारी संजय पऱ्हाड, शिल्पा उमाप, कोमल पवार, रोहिणी खंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी केलेले काम प्रशंसनीय असल्याने त्यांना जिल्हा परिषदेनेही सन्मानित करावे, असे विनंतीपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्याकडे पाठविल्याची माहिती यावेळी सासवडे यांनी दिली.

--

२३ शिक्रापूर लसीकरण सत्कार

फोटो ओळी : केंदूर -पाबळ प्राथमिक आरोग्य आधिकारी व स्टाफचा सत्कार करताना (धनंजय गावडे).

230921\1741-img-20210923-wa0031.jpg

?????? ???????

Web Title: Reception of high vaccinators in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.