आता चीज गार्लीक ब्रेड करणं होणार एकदम सोपं, ही घ्या कृती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:28 PM2019-07-17T18:28:44+5:302019-07-17T18:52:16+5:30

सगळ्यांचा लाडका चीज गर्लिक ब्रेड बनवणे झाले एकदम सोपे. ही घ्या भन्नाट रेसिपी. 

recipe of cheese garlic bread | आता चीज गार्लीक ब्रेड करणं होणार एकदम सोपं, ही घ्या कृती 

आता चीज गार्लीक ब्रेड करणं होणार एकदम सोपं, ही घ्या कृती 

googlenewsNext

सगळ्यांचा लाडका चीज गर्लिक ब्रेड बनवणे झाले एकदम सोपे. ही घ्या भन्नाट रेसिपी. 

साहित्य :

  • मैदा पाव किलो   
  • कोमट पाणी अर्धी वाटी   
  • साखर एक  लहान चमचा  
  • ड्राय यीस्ट एक लहान चमचा 
  • मीठ 
  • ओरीगानो  
  • चिली फ्लेक्स( सुक्या लाल मिरचीचे तुकडे )
  • बारीक चिरलेली सिमला मिरची.
  • बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या दोन 
  • चीज 
  • बटर


कृती :

  •  पाण्यात साखर विरघळवून घ्या. 
  • साखर विघळली की यीस्ट टाका आणि दहा मिनीटे झाकून ठेवा. 
  • दहा मिनीटानंतर त्यात मैदा, मीठ,ओरीगानो, चिलीफ्लेक्स टाका, व हळूवार मळा 
  • एकदा तेलाचा हात लावून मळलेलं पीठ दीड तास झाकून ठेवा. 
  • एका वाटीत बटर ,कोंथबीर, बारीक चिरलेला लसूण, ओरीगानो घालून एकत्र करून घ्या. 
  • कढईत खडे मीठ टाका व एक स्टँन्ड ठेवून प्री हिट करण्यासाठी अर्धा तास ठेवा. 
  • आता तयार पीठाचे दोन भाग करा. 
  • पहिल्यांदा एक गोळा मध्यम जाड लाटा. त्यावर बटरचे मिश्रण लावा.स्वीटकॉर्न व सिमला मिरची पसरवा व चीज किसा.व नंतर ओरीगानो व चिलीफ्लेक्स टाका आणि कडा दुमडून घ्या. 
  • एका डिशमध्ये हा ब्रेड ठेवा. असाच दुसरा ब्रेड बनवून घ्या. 
  • आता तयार डिश ५० मिनिटे बेक करा आणि जरासे थंड झाल्यावर सर्व्ह करा गरमागरम  चिज गार्लीक ब्रेड. 

Web Title: recipe of cheese garlic bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.