आरोग्य विभागात परस्पर नेमणूक
By admin | Published: November 29, 2014 10:57 PM2014-11-29T22:57:13+5:302014-11-29T22:57:13+5:30
आरोग्य विभागाच्या कार्यालयात खासगी कामगाराची परस्पर नेमणूक केल्याचा प्रकार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनीच उघड केला.
Next
बारामती : नगरपालिकेत ठेकेदारी पद्धतीने काम करण्यासाठी कामगार घेतले जातात. परंतू नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात खासगी कामगाराची परस्पर नेमणूक केल्याचा प्रकार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनीच उघड केला. हा कामगाराला ठेकेदाराने चालक म्हणून कामाला घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात तो आरोग्य विभागाच्या कार्यालयात कार्यरत आहे. महत्वाच्या कागदपत्रंची हाताळणी करतानाचे छायाचित्र नगरपालिकेत सादर करण्यात आले. तेव्हा सर्वजण आवाक झाले.
बारामती शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सार्वजनिक स्वच्छता, कचरा गाडय़ांसाठी ठेकेदारी पद्धतीने कामगार घेतले आहेत. मात्र, नगरपालिकेचे आरोग्य विभाग ठेकेदाराच चालवित आहेत, की अधिका:यांची ठेकेदाराशी मिलीभगत आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
ढोले म्हणाले, ‘ हा कोण व्यक्ती आहे. त्याची नेमणूक कोणी केली, तो कार्यालयात बसून महत्वाच्या फायली कशा हातळू शकतो,’ याचे उत्तर मिळावे. त्यावर सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. नगरपालिकेत चाललेला हा मनमानी कारभार आहे, त्याचा उत्तम नमूना असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. याचे उत्तर कोणालाच देता येईना. परंतू नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आरोग्य खात्याचे प्रमुख सुभाष नारखेडे यांनी दिलेले उत्तर देखील धक्कादायक होते. आरोग्य विभागात विविध कामांसाठी 5 ठेकेदारांना काम दिले आहे. त्यांचे काम करण्यासाठी या कामगाराची नेमणूक केली. तो कार्यालयातच बसून काम करतो. त्याचे वेतन कोण देतो, त्याच्या नेमणूकीसाठी कोणी परवानगी दिली, यावर नारखेडे निरूत्तर झाले.
(प्रतिनिधी)
4प्रशासकिय इमारतीचे काम सुरू असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज पाण्याच्या टाकीखालील कोप:यातील खोलीत चालते. तेथे वर्दळ नाही. त्याचा फायदा घेऊन आरोग्य विभागाचा कारभार संभाळण्यासाठी परस्पर कामगार नेमला आहे. त्याच्याकडे आरोग्य खात्याच्या जमा खर्चाचे कामकाज दिले आहे.
4ढोले यांनी कार्यालयात काम करीत असलेल्या कर्मचा:याचे छायाचित्रच सादर केले. तेव्हा सर्वच नगरसेवक आवाक झाले.