रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:51 AM2023-07-19T09:51:57+5:302023-07-19T09:55:00+5:30

रिक्षातून खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला

Recklessness of the rickshaw puller Sudden braking on the speed breaker the young woman fell from the rickshaw and died | रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

googlenewsNext

पुणे : रिक्षाचालकाचा बेदरकारपणा तरुणीच्या जीवावर बेतला असून, स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबल्याने रिक्षातून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिर येथे १५ जुलैला मध्यरात्री २ वाजता घडली. सपना राम राठोड (वय ३०, रा. जांभुळवाडी रोड) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत मृताची आई रंजनाबाई आडे (५०, रा. लिपाणे वस्ती) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण सुरवसे (३२, रा. कामठे वस्ती) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, सपना राठोड या १५ जुलैला रात्री दोनच्या सुमारास रिक्षातून डेक्कन परिसरात जेवण करण्यासाठी जात होती. त्यावेळी रिक्षाचालक सुरवसे याने नवशा मारूती मंदिर परिसरात स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे रिक्षातून खाली पडल्यामुळे सपना गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Web Title: Recklessness of the rickshaw puller Sudden braking on the speed breaker the young woman fell from the rickshaw and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.