आपल्या भूमिकेचा धर्म ओळखून समाजासाठी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:03+5:302021-02-24T04:12:03+5:30

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने ‘सामाजिक भूमिका निभावताना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ...

Recognize the religion of your role and work for the society | आपल्या भूमिकेचा धर्म ओळखून समाजासाठी कार्य करावे

आपल्या भूमिकेचा धर्म ओळखून समाजासाठी कार्य करावे

Next

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने ‘सामाजिक भूमिका निभावताना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. अरुण अडसूळ हे होते. त्यांनी उपस्थितांना आयुष्याचा अर्थ शोधण्यात वेळ घालविण्याऐवजी अर्थपूर्ण आयुष्य कसे जगावे, या विषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे यांनी केले. यावेळी आजच्या तरुणाईने स्वतःसाठी जगताना समाजासाठीही जगता आले पाहिजे, असा कानमंत्र दिला.

यावेळी प्रमिला गायकवाड, ॲड. भगवानराव साळुंखे, विजयसिंह जेधे, संभाजी कापसे, मारुतराव साळुंखे, किशोर बाबर, प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, डॉ. झीनत खान, डॉ. शुभदा घोलप शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक प्रा. नवनाथ सरोदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल वीर व प्रा. प्राजक्ता कचरे यांनी केले.

Web Title: Recognize the religion of your role and work for the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.