खामगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:19+5:302021-09-21T04:12:19+5:30

-------- पाटेठाण : खामगाव (ता.दौंड) येथील गावठाण हद्दीतील कथित अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खामगाव ग्रामपंचायतीचे ...

Recommendation to dismiss Khamgaon Gram Panchayat | खामगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्याची शिफारस

खामगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्याची शिफारस

--------

पाटेठाण : खामगाव (ता.दौंड) येथील गावठाण हद्दीतील कथित अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खामगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी लेखी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. बरखास्तीच्या मागणीमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष बबन नागवडे यांनी याबाबत सन २०१६ मध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.त्यानुसार संबंधित बांधकाम पाडण्याबाबत अनेक वेळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस नोटीस काढली. मात्र संबंधित बांधकाम पाडण्यात ग्रामपंचायतीला अपयश आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ग्रामपंचायत शिष्टमंडळ बरखास्त कारवाई करणेबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून अनेक वेळा दौंडचे गटविकास अधिकारी यांना अतिक्रमण पाडण्याबाबत स्मरणपत्रही काढण्यात आली होती. त्यानुसार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तत्कालीन खामगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व कार्यकारी मंडळ यांना अनेकदा आदेश करूनही देखील गायरान व सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण बांधकाम रोखण्यात अपयश आल्याने पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

.................................................................................................................

कोट

हा वाद अगोदर सुमारे चार वर्षांपासून असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. शासकीय नियमानुसार संबंधित प्रकरणाबाबत कार्यवाही होईल.

योगेश मदने

सरपंच, खामगाव,

--

कोट

जवळपास दोन हजार दिवसांंपासून प्रकरण प्रलंबित असून, यावर मुख्यमंत्री कार्यालयातही दाद मागितली आहे. प्रशासन काळजीपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

संतोष नागवडे

सामाजिक कार्यकर्ता, खामगाव

.................................................................................................................

200921\1456-img-20210919-wa0022.jpg

सोबत फोटो.

खामगाव ग्रामपंचायत येथील कार्यालयाचा फोटो इमेल करत आहे.

Web Title: Recommendation to dismiss Khamgaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.