ओतूर उपबाजारात गुरुवारी ३६ हजार ८२ पिशव्यांची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:21+5:302021-08-27T04:16:21+5:30

बाजार भावात घसरण सुरू ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार ओतूर येथे गुरुवारी ३६ हजार ८२ कांदा ...

Record arrival of 36,082 bags in Ootur sub-market on Thursday | ओतूर उपबाजारात गुरुवारी ३६ हजार ८२ पिशव्यांची विक्रमी आवक

ओतूर उपबाजारात गुरुवारी ३६ हजार ८२ पिशव्यांची विक्रमी आवक

Next

बाजार भावात घसरण सुरू

ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार ओतूर येथे गुरुवारी ३६ हजार ८२ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन प्रतवारीनुसार नं.१ गोळा कांद्यास १० किलोस १६० रुपये ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. पण बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे व कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली

गुरुवारी प्रतवारीनुसार १०किलोचे भाव खालील प्रमाणे -- कांदा नं. १ गोळा १६० रुपये ते १८० रुपये, सचपर कांदा -१३० ते १७० रुपये , कांदा नं. २- गोल्टा - ९० रुपये ते १३० रुपये, कांदा नं. ३ -गोलटी / बलला -३० रुपये ते ९० रुपये. बटाटा बाजारभाव - गुरुवारी २८ पिशव्या आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस २५ रुपये ते ६० रुपये. लसूण फक्त तीन पिशव्या आवक १० किलोस प्रतवारीनुसार ३०० रुपये ते ५०० रुपये भाव मिळाला अशी माहिती कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: Record arrival of 36,082 bags in Ootur sub-market on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.