ओतूर बाजारात नव्या कांद्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:18+5:302021-03-05T04:12:18+5:30
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतुर उपबाजारात गुरुवारी २४ हजार ८६५ नवीन कांदा पिशव्यांची ...
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतुर उपबाजारात गुरुवारी २४ हजार ८६५ नवीन कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस २४० ते २६० रुपये व सुपर कांद्यास २२० ते २४० रुपये बाजार भाव मिळाला. भाव स्थिर आहेत, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव खालीलप्रमाणे: कांदा नं. १-(गोळा)- २४० ते २६० रुपये.
नं. १ (सुपर) २२० ते २४० रुपये.
कांदा नं. २-(कवचट)- १८० ते २२० रुपये.
कांदा नं. ३- (गोल्टा) -१३० ते १८० रुपये. कांदा नं.४ -(गोल्टी / बदला) ५० ते १५० रुपये. बटाटा बाजार : गुरुवारी ओतूर उपबाजार आवारात ५३७ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ३० ते १६० रुपये बाजारभाव मिळाला. प्रतवारीनुसार १० किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती ओतूर उपबाजार आवार कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.