चाकण बाजारात कांद्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:51 AM2017-08-07T02:51:31+5:302017-08-07T02:51:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची विक्रमी आवक होऊन भावही कडाडले. तळेगाव बटाटा व जळगाव भुईमूग शेंगा यांची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. लसणाची आवक होऊन व भावही स्थिर राहिले. टोमॅटो, कोबी, दोडका व वांग्याची किरकोळ आवक झाली. बंदुक भुईमूग शेंगेची काहीच आवक झाली आहे. हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. एकूण उलाढाल १ कोटी ६५ लाख रुपय झाली.
पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक व शेपूच्या भाजीची विक्रमी आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हशी व शेळ्यामेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ७५0 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३२0 क्विंटलने वाढूनही भावात १0५0 रुपयांनी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १५५0 रूपयांवरून २६00 रूपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ११00 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४१२ क्विंटलने घटूनही, कमाल भाव ७00 रूपयांवर स्थिरावले.जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक १५ क्विंटल झाली, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९ क्विंटलने घटूनही कमाल भाव ५५00 रुपयांवर स्थिरावले. बंदुक भुईमूग शेंगाची काहीच आवक झाली नाही . लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व कमाल भावही ५000 रुपयांवर स्थिरावले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३३४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४५ क्विंटलने वाढली. या मिरचीला २000 ते ४000 रुपये असा कमाल भाव मिळाला. राजगुरुनगर येथील मुख्य बाजारासह शेलपिंपळगाव येथील उपबाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. विशेष म्हणजे शेलपिंपळगाव येथील उपबाजारात हिरवी मिरची, फरशी व वाटाणा वगळता फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात हिरवी मिरची, कोबी व फ्लॉवरची उच्चांकी आवक झाली. काकडी व फरशीची आवक स्थिर राहिली. तसेच बाजारात टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, कारली, दुधी भोपळा, वालवड, ढोबळी मिरची व शेवग्याची काहीच आवक झाली नाही.
शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा - एकूण आवक - ७५0 क्विंटल. भाव क्रमांक १- २६00 रुपये, भाव क्रमांक २ - २000 रुपये, भाव क्रमांक ३- १000 रुपये. बटाटा- एकूण आवक - १ हजार १00 क्विंटल. भाव क्रमांक १- ७00 रुपये , भाव क्रमांक २ - ६00 रुपये, भाव क्रमांक ३ - ५00 रुपये.
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
टोमॅटो - ६४१ पेट्या (३000 ते ५000 रु.), कोबी - १४७ पोती (३00 ते ७00 रु.), फ्लॉवर -२७४ पोती (१२00 ते १८00 रु.), वांगी - ३१0 पोती (२५00 ते ४५00 रुपये), भेंडी - २८४ पोती (२५00 ते ४५00 रुपये), दोडका - १९४ पोती (३000 ते ४000 रुपये), कारली -२३२ डाग (३५00 ते ४५00 रुपये), दुधीभोपळा - ४९ पोती (२000 ते ३000 रु.), काकडी - ९८ पोती (२000 ते ३000 रुपये), फरशी - ४७ पोती (४000 ते ५000 रुपये), वालवड - १४५ पोती (२000 ते ४000 रु.), गवार - ११३ पोती (४000 ते ६000 रुपये), ढोबळी मिरची -२0८ डाग (३000 ते ४५000 रुपये), चवळी - ११३ पोती (१५00 ते २५00 रुपये), वटाणा - १४८ पोती (४000 ते ६000 रु.), शेवगा - ६७ पोती (४000 ते ६000 रुपये).
पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
मेथी आवक - एकूण २१ हजार ९३२ जुड्या (३00 ते ७00 रुपये), कोथिंबीर आवक- एकूण २३ हजार ६३८ जुड्या (२00 ते ५00 रुपये), शेपू आवक - ५ हजार ६७२ जुड्या (३00 ते ६00 रुपये ), पालक - एकूण ३ हजार ९६३ जुड्या (४00 ते ६00 रुपये).
जनावरे :
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११५ जर्शी गायींपैकी ९८ गायांची विक्री झाली. (२0,000 ते ४0,000 रुपये), ११८ बैलांपैकी ८५ बैलांची विक्री झाली. (१0,000 ते ३0,000 रुपये), ९५ म्हशींपैकी ५८ म्हशींची विक्री झाली (२0,000 ते ६0,000 रुपये), शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३२१0 शेळ्यामेंढ्यापैकी २९९0 शेळ्या मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना २000 ते ९000 हजार रुपये इतका भाव मिळाला.