सुप्यात चिंचेची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:37+5:302021-03-30T04:08:37+5:30

सुपे: बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये चिंचेच्या १० हजार ३४१ पोत्यांची मोठी आवक झाल्याने बाजारभावात ४०० रुपयांची ...

Record arrival of tadpoles in Supat | सुप्यात चिंचेची विक्रमी आवक

सुप्यात चिंचेची विक्रमी आवक

Next

सुपे: बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये चिंचेच्या १० हजार ३४१ पोत्यांची मोठी आवक झाल्याने बाजारभावात ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेल्या चिंचेला योग्य बाजार न मिळाल्याने काहींनी चिंच अंसुड केली.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजाराकडे जिल्ह्यातील सर्वात मोठी चिंचेची बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. येथील बाजारामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, भोर, फलटण आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर चिंच खरेदीसाठी लातूर, बार्शी, तुळजापूर, अहमदनगर व आंध्रप्रदेश मधून खरेदीदार येत असतात अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे यांनी दिली. येथील चिंचेचा बाजार शनिवारचा असतो. मात्र आवक वाढल्याने रविवारीही चिंचेचे लिलाव सुरु असतात. यावेळी येथील उपबाजारात चिंचेच्या एकूण १० हजार ३४१ पोत्यांची आवक झाली. तर अखंड चिंचेस १६११ ते २६०० व फोडलेल्या चिंचेस ५ हजार ते ७ हजार १०० रुपये बाजार भाव मिळाला. तसेच चिंचोक्यास १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल बाजार मिळाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने एकूण चोवीस हजार पोत्यांची आवक झाली होती. चालूवर्षी आज अखेर ४५ हजार ९२९ पोत्यांची आवक झाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. येथील चिंच लिलाव दर शनिवारी असून जास्तीत जास्त शेतक?्यांनी चिंच विक्रीसाठी आणावी. तसेच चिंचेचे लिलाव मे अखेरपर्यंत चालतील अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय सणस यांनी दिली. येथील मागिल आठवड्यात चिंचेची मोठी आवक झाल्याने बाजारभावात घसरण झाली. तसेच वर्षे अखेर व महिना अखेरच्या सुट्टया आल्याने बाजारभावावर परिणाम झाल्याची माहिती येथील आडत व्यापारी सुभाष चांदगुडे यांनी दिली.

सुपे येथील बाजारात चिंचेची आवक वाढल्याने रविवारी चिंचेचे लिलाव सुरु होते.

२९०३२०२१-बारामती-२०

-----------------------------

Web Title: Record arrival of tadpoles in Supat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.