PMC: पुणे महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी बजेट; यंदा ८ हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:08 PM2022-03-07T16:08:05+5:302022-03-07T16:08:29+5:30

सन २०२२ - २३ साठीचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर करण्यात आले आहे

Record budget in the history of Pune Municipal Corporation 8000 crore budget presented this year | PMC: पुणे महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी बजेट; यंदा ८ हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर

PMC: पुणे महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी बजेट; यंदा ८ हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर

googlenewsNext

पुणे : पुणे महानगरपालिकेचे सन २०२२ - २३ साठीचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर करण्यात आले आहे. यावर्षीसाठी तब्बल ८ हजार ५९२ कोटींचे बजेट असणार आहे. गतवर्षी पेक्षा ९४२ कोटीने हे वाढविले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे बजेट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

अंदाजपत्रकात भांडवली व विकास कामांसाठी २ हजार ७४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा प्रकल्प करिता ६६२ कोटी, मलनिस्सारण प्रकल्प करीता ३०७ कोटी तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी पालिकेचे उत्पन्न ५४०० कोटी झाले आहे. एकूण खर्चात ५०० कोटींची वाढ झाली असून ४ हजार ७०० कोटी महसुली खर्च तर ३ हजार ९०० कोटी विकास कामांसाठी तरतुद करण्यात आली आहे. 

Web Title: Record budget in the history of Pune Municipal Corporation 8000 crore budget presented this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.