पळसदेवमध्ये विक्रमी कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:05+5:302021-09-02T04:22:05+5:30
सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रंगा लावल्या होत्या. यामध्ये प्रथमच आलेल्या नागरिकांना पहिला व यापूर्वी पहिला डोस घेतल्या ...
सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रंगा लावल्या होत्या. यामध्ये प्रथमच आलेल्या नागरिकांना पहिला व यापूर्वी पहिला डोस घेतल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. या वेळी अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता व १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. पळसदेव आरोग्य केंद्रात ८ मार्चपासून लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली होती. ते आजपर्यंत सुमारे नऊ ते दहा हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले, असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा यांनी या वेळी बोलताना दिली. आतापर्यंत एकशे एेंशी, दोनशे, दोनशे दहापर्यंत एका दिवशी लसीकरण झाले होते. मात्र, आज सर्वच कर्मचाऱ्यांनी अगदी दुपारची जेवणाची सुट्टी देखील ना करता अविरत काम करून लसीकरणाचा विक्रम केला. या वेळी वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा, आरोग्य सेविका कविता कांबळे, डाटा आॅपरेटर सारला पवार, नीलेश रंधवेसह आशा सेविका यांनी विशेष सहकार्य केले.
फोटो : लसीकरणासाठी आरोग्य केंद्राच्या बाहेर मोठ्या रंगा पाहावयास मिळाल्या.
०१०९२०२१-बारामती-०२
-----------------------