95 टक्के भरलं उजनी, पाणीपातळीत विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:50 AM2018-08-26T00:50:12+5:302018-08-26T00:50:49+5:30

उजनी धरण ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे

A record high growth of 95% | 95 टक्के भरलं उजनी, पाणीपातळीत विक्रमी वाढ

95 टक्के भरलं उजनी, पाणीपातळीत विक्रमी वाढ

googlenewsNext

पुणे - उजनी धरण ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी जलाशयाचे टिपलेले छायाचित्र.

पळसदेव : महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे असलेले उजनीधरण हे ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. मागील दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी धरणात ७३ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत ९५ टक्के झाले होते. दोन दिवसांत चक्क २२ टक्के वाढ झाली आहे.

उजनी धरणात येणाºया पाण्याचा विसर्ग कमी झाला असला, तरी उजनी जलाशय रविवारपर्यंतशंभर टक्के होईल, अशी आशा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली. शनिवारी दुपारी माहिती घेतली असता, बंडगार्डन येथून ९७२0, तर दौंड येथून २४३४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांत शंभर टक्के होईल यामुळे उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

बोगद्यातून ९00, तर कालव्यातून ३२00 क्युसेक असा एकूण ४१00 क्युसेक विसर्ग चालू आहे. हे धरण हे तीन जिल्ह्यांचे वरदायिनी समजले जाते. पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथील शेतकरी खूष झाला आहे. पाणी वाढत असल्याने विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. तर अनेक ठिकाणी कडवळासारखी पिके पाण्यात गेली आहेत.

उजनीलगतचा तुपाशी अन् तलावालगतचा उपाशी...
पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामधे खडकवासला धरणाचाही समावेश आहे. खडकवासला धरणावर अवलंबून असणारे इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. असे असतानासुद्धा जलसंपदा विभागाचे अधिकारी कालव्यातून पाणी सोडून तलाव भरण्यासाठी काहीच करत नाहीत. इतर धरणात पाणी सोडण्याऐवजी तलावात पाणी सोडावे, अशी शेतकºयांची मागणी आहे. मदनेवाडे ते इंदापूरपर्यंतचे तलाव कोरडे पडले आहेत. उजनी धरणात पाणी आहे, तर दुसरीकडे तलाव कोरडे हा विरोधाभास पाहायला मिळतो.

Web Title: A record high growth of 95%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.