PMC | पुणे महापालिकेला विक्रमी १ हजार ८४५ कोटी रुपये मिळकत कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:05 PM2022-04-01T12:05:00+5:302022-04-01T12:05:02+5:30

इतक्या मोठ्या प्रमाणात नव्याने कर आकारणीचेही हे पहिलेच आर्थिक वर्ष

record income tax of 1 thousand 845 crore to pune municipal corporation pmc | PMC | पुणे महापालिकेला विक्रमी १ हजार ८४५ कोटी रुपये मिळकत कर

PMC | पुणे महापालिकेला विक्रमी १ हजार ८४५ कोटी रुपये मिळकत कर

googlenewsNext

पुणे :पुणे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात मिळकत करापोटी १८४५ कोटी इतकी विक्रमी रक्कम जमा झाली आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीमध्ये ८ लाख ६८ हजार ६७१ मिळकतधारकांनी मिळकत करापोटी १८४५ कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील ही आजवरची उच्चांकी मिळकत कर रक्कम आहे. एका आर्थिक वर्षात ७१ हजार २२० इतक्या मोठ्या प्रमाणात नव्याने कर आकारणीचेही हे पहिलेच आर्थिक वर्ष ठरले आहे.

पहिल्या २ महिन्यांमध्ये सवलतीने रक्कम भरण्यासाठी एसएमएस, ई-मेल पाठवण्यात आले. खात्यामधील सेवकांमार्फत मिळकतींना प्रत्यक्ष भेटी देणे, संबंधित मिळकतधारकांना फोनवरून कर भरण्याबाबत आवाहन करणे अशा योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यांमध्ये ५ लाख ८ हजार ७१५ मिळकतधारकांनी ७४५ कोटी मिळकत कर जमा केला, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

महापालिकेतर्फे ७ जानेवारी ते २६ जानेवारी २०२२ आणि ८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी निवासी मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू करण्यात आली होती. याअंतर्गत ४८ हजार ३०४ मिळकतधारकांकडून १०८.८३ कोटी इतका मिळकत कर वसूल करण्यात आला. आतापर्यंत ७१ हजार २२० इतक्या नव्या मिळकतींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे वार्षिक सरासरी रक्कम २१९ कोटी रुपये इतका मिळकत कर कायमस्वरूपी जमा होण्यास मदत होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे ९८ हजार ६११ मिळकतींची बदलाप्रमाणे वाढीव आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे २०१.४ कोटी रुपये इतक्या कराची मागणी नव्याने कायमस्वरूपी प्राप्त झाली आहे.

आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींकडून पाठपुरावा करूनही मिळकत कर न भरल्यामुळे विशेषत: व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींची मोठ्या प्रमाणात अटकावणी करण्यात आली. मागील तीन महिन्यांमध्ये १६ हजार २६९ व्यावसायिक मिळकतधारकांनी १८५.४० कोटी रुपये मिळकत कर जमा केला. खात्याकडे मिळकत करासंदर्भात नाव दुरुस्ती, तीन पट आकारणी, ४० टक्के सवलत, क्षेत्रफळ दुरुस्ती, आदी लेखी निवेदन आणि ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या २५ हजार ३८८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. पीएमसी पोर्टलवर १०६० पैकी ९९८, आपले सरकार पोर्टलवरील ९४ पैकी ९४, पीजी पोर्टलवरील ५१ अशा तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.

गेल्या पाच आर्थिक वर्षांमधील मिळकत कर भरणा :

वर्ष भरणा (कोटींमध्ये)

२०१७-१८ १०८४.३९

२०१८-१९ ११८४.३८

२०१९-२० १२६२.९५

२०२०-२१ १६६४.१५

२०२१-२२ १८३६.९१

जमा झालेली रक्कम

तपशील मिळकतींची संख्या रक्कम (कोटींमध्ये)

निवासी मिळकत ७,०१,०९२ ८६४.४३

बिगर निवासी मिळकत ९९,३९९ ७३५.६१

मोकळ्या जागा मिळकत १०,०४३ ७७.९३

नवीन मिळकत कर आकारणी ७१,२२० २७६.७९

समाविष्ट २३ गावांतील मिळकत ४५,२८९ ३८.९९

मिश्र मिळकती १२,८४८ १०८.८४

Web Title: record income tax of 1 thousand 845 crore to pune municipal corporation pmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.