महावितरणकडून मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:08+5:302021-03-13T04:18:08+5:30

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही ...

Record power supply as per demand from MSEDCL | महावितरणकडून मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा

महावितरणकडून मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा

Next

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. मात्र, मंगळवारी (दि. ९) राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार २०३ मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यात आली. राज्याचे ऊर्जामंत्रीना. डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. महावितरणने आतापर्यंत केलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासोबतच दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे हे यश आहे. त्यामुळे तब्बल २२ हजार मेगावॉट पेक्षा अधिक क्षमतेच्या विजेचे वहन सध्या अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून शक्य झाले आहे. उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरु आहे.

Web Title: Record power supply as per demand from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.