साळवाडीतील शेतकऱ्याने केले बटाट्याचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:56+5:302021-03-28T04:10:56+5:30

साळवाडी येथील शेतकरी सुभाष काळे यांनी आपल्या गट नंबर ५२४ मधील क्षेत्रात एच. एफ.या वाणाचे बटाटा बियाणे ८.५ क्विंटल ...

Record production of potatoes by a farmer in Salwadi | साळवाडीतील शेतकऱ्याने केले बटाट्याचे विक्रमी उत्पादन

साळवाडीतील शेतकऱ्याने केले बटाट्याचे विक्रमी उत्पादन

Next

साळवाडी येथील शेतकरी सुभाष काळे यांनी आपल्या गट नंबर ५२४ मधील क्षेत्रात एच. एफ.या वाणाचे बटाटा बियाणे ८.५ क्विंटल (१७ गोणी) खरेदी केली. याची लागवड त्यांनी डिसेंबर अखेर केली. लावगडीबरोबर कोंबडीखत व १०.२६ या खताचा वापर केला. बटाट्याला चार ते पाच फवारण्या कृषी सल्लागार प्रवीण गुंजाळ यांच्या सल्ल्यानुसार केल्या.वेळोवेळी विद्राव्य खतांच्या मात्राही दिल्या. वेळोवेळी खतांचे डोस, खुरपणी,पाणी देणे,फवारणी हे सर्व वेळेत केल्यामुळे त्यांना विक्रमी असे उत्पादन मिळण्यास मदत झाली आहे.

सुभाष काळे म्हणाले की, ४० गुंठे क्षेत्रात एकूण भांडवली खर्च ९० हजार एवढा आला असून उत्पादन १५ टन निघाले.शेताच्या बांधावर व्यापाऱ्याला १० रुपये प्रतिकिलो दराने बटाटा विकला. यामधून १ लाख ५० हजार रुपये मिळाले. भांडवली खर्च वजा जाता ६० हजार रुपये नफा शिल्लक राहिला. बाजार भाव कमी असल्याने उत्पादनाच्या होणाऱ्या नफ्यात घट झाली आहे

२७ बेल्हा.

Web Title: Record production of potatoes by a farmer in Salwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.