स्केटिंग स्पर्धेत ‘शिवाजी उदय’ची विक्रमी कामगिरी

By admin | Published: November 17, 2016 03:15 AM2016-11-17T03:15:11+5:302016-11-17T03:15:11+5:30

बेळगाव येथे झालेल्या विश्वविक्रमामध्ये सलग २४ तास स्केटिंग केल्यामुळे चिंचवडच्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या १६ विद्यार्थ्यांचे नाव गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे़

Record of Shivaji Uday in skating competition | स्केटिंग स्पर्धेत ‘शिवाजी उदय’ची विक्रमी कामगिरी

स्केटिंग स्पर्धेत ‘शिवाजी उदय’ची विक्रमी कामगिरी

Next

पिंपरी : बेळगाव येथे झालेल्या विश्वविक्रमामध्ये सलग २४ तास स्केटिंग केल्यामुळे चिंचवडच्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या १६ विद्यार्थ्यांचे नाव गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे़ ओमनगर येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़
दोन दिवस चाललेल्या या स्केटिंगमध्ये देशभरातून सुमारे ६६१ जण सहभागी झाले होते़ यामध्ये २०० जणांनी २०० मीटरच्या स्केटिंग रिंगवर सुमारे ४०० कि लोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले़ त्यामुळे याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे़ स्पर्धेत अथर्व देशपांडे, गौरव डहाळे, आदित बन्सीवाल, मानस देशमुख, शौर्य देशमुख, आलोक चोपडा, आर्यन डागा, रूद्रांक्ष शर्मा, अर्णव काटकर, कैवल्य कुं भार, आयुष पाटील, चिराग बेटगिरी, ईशान कोल्हे, सार्थक वाबळे, अथर्व माटे यांनी सहभाग घेतला होता़ विश्वविक्रम होताच विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’,‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या़ मिठाई वाटून आणि फ टाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजाराम गावडे, विलास देशपांडे, कांचन देशपांडे, पवन लोहार, सोनु गोहेर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Record of Shivaji Uday in skating competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.