संचालक, अधिकाऱ्यांकडून वसुली
By admin | Published: March 5, 2016 12:42 AM2016-03-05T00:42:43+5:302016-03-05T00:42:43+5:30
रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले
पुणे : रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे. यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींना अपिल करण्यासाठी देण्यात आलेली ४ आठवडयांची मुदत संपल्याने त्यांच्यावरील कारवाईचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवडयात या सर्वांना वसुलीसाठीच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. पुढील आठवडयात
वसुलीची कारवाई करण्यासाठी सहकार विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यानंतर थेट वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गरज पडल्यास दोषींच्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीचीही कारवाई होणार आहे़ बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया, संचालक अनंतराव कुलकर्णी, काशिनाथ पेमगिरीकर, माधव नातू, गायत्रिदेवी पटवर्धन, गजानन देव, शशिकुमार भिडे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्यासह १५ संचालक व ५४ तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध ही कारवाई होईल़