दोषींकडून सुरू होणार वसुली

By admin | Published: March 5, 2016 12:53 AM2016-03-05T00:53:22+5:302016-03-05T00:53:22+5:30

रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रुपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे

Recovery by the accused will begin | दोषींकडून सुरू होणार वसुली

दोषींकडून सुरू होणार वसुली

Next

पुणे : रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रुपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे. यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींना अपील करण्यासाठी देण्यात आलेली ४ आठवड्यांची मुदत संपल्याने त्यांच्यावरील कारवाईचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात या सर्वांना वसुलीसाठीच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.
बँकेतील आर्थिक घोटाळ््यांची चौकशी अधिकारी पणन संचालक किशोर तोष्णीवाल यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्याचा अहवाल त्यांनी २ फेब्रुवारीला जाहीर केला. यात आर्थिक घोटाळयासाठी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आणि त्यांच्याकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आठवडयाभरात हा अहवाल तोष्णीवाल यांनी सहकार आयुक्तांकडे सुपूर्त केला. हा अहवाल सुपूर्त केल्यानंतर पुढील ४ आठवडे या दोषी संचालक, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपिल करण्यासाठीची मुभा न्यायालयाने दिली होती. त्या काळात त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुभ्याचा हा कालावधी या आठवडयात संपला. त्यामुळे पुढील आठवड्यात वसुलीची कारवाई करण्यासाठी सहकार विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यानंतर थेट वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गरज पडल्यास दोषींच्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीचीही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया, संचालक अनंतराव कुलकर्णी, काशिनाथ पेमगिरीकर, माधव नातू, गायत्रीदेवी पटवर्धन, गजानन देव, शशिकुमार भिडे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्यासह १५ संचालक व ५४ तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Recovery by the accused will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.