कोरोना काळातही पोलिसांची वसुली, ९ अधिकारी, कर्मचारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:10+5:302021-09-02T04:21:10+5:30

पुणे जिल्ह्यात लाचखोरीचे ४२ गुन्हे दाखल लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागातील पुणे जिल्ह्यातील ...

Recovery of police during Corona period, 9 officers, staff trapped | कोरोना काळातही पोलिसांची वसुली, ९ अधिकारी, कर्मचारी जाळ्यात

कोरोना काळातही पोलिसांची वसुली, ९ अधिकारी, कर्मचारी जाळ्यात

googlenewsNext

पुणे जिल्ह्यात लाचखोरीचे ४२ गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागातील पुणे जिल्ह्यातील ९ अधिकारी आणि कर्मचारी या काेरोना काळात आतापर्यंत लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.

पुणे जिल्ह्यात आता ऑगस्टअखेर पुणे जिल्ह्याचे लाचखोरीचे ऑगस्टअखेर ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात पोलीस विभागात एकूण ७ सापळा कारवाई करण्यात आली असून त्यात ९ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात लाचखोरीबाबत सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यात येत असतात. राज्यातील एकूण सापळा कारवाईमध्ये पुणे जिल्हा व पुणे विभागात कारवाईमध्ये नेहमीच आघाडीवर असतो. राज्यात पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेरपर्यंत सर्वाधिक ४२ सापळा कारवाई करण्यात आल्या आहेत.

५ हजारांपासून साडेतीन लाखांपर्यंत लाच

जाहिरात फलकासाठी वाहतूक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ३ लाख ६० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पोलीस अधिका-याला पकडले होते.

फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीच्या जामिनासाठी पोलिसांचे म्हणणे सादर करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख रुपयांची लाच कामशेत पोलीस ठाण्यातील हवालदारामार्फत स्वीकारताना पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांना पकडण्यात आले होते.

मारहाणीच्या प्रकरणात नाव कमी करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी एकाकडे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती १ लाख १० हजार रुपये स्वीकारताना बारामतीत एका हवालदाराला सापळा कारवाईत पकडण्यात आले होते.

१ जानेवारी ते ऑगस्टअखेर पुणे जिल्ह्यातील सापळा कारवाई

२०२१ - ४१

२०२० - ३१

लाच मागितली जात असेल, तर येथे संपर्क साधा

०२० - २६१२२१३४, २६१२२८०२, २६०५०४२३

व्हॉट्सॲप नंबर - ७८७५३३३३३३

Web Title: Recovery of police during Corona period, 9 officers, staff trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.