नसरापूर ग्रामपंचायतकडून पहिल्याच दिवशी अडीच लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:29+5:302021-03-28T04:11:29+5:30
नसरापूर ग्रामपंचायतीचा ८० लाखांपेक्षा अधिक थकीत कर आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक बिघडली आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यावर ग्रामपंचायतीने भर ...
नसरापूर ग्रामपंचायतीचा ८० लाखांपेक्षा अधिक थकीत कर आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक बिघडली आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यावर ग्रामपंचायतीने भर दिला आहे.थकबाकीदाराना यापुर्वी वारंवार नोटीस देऊन , ग्रामपंचायत घंटा गाडीच्या माध्यामातून जाहीर आवाहन करून तसेच ग्रामपंचायत लिपीक यांच्याकडून फोनवरून संपर्क साधून देखीलही काही लोकांनी गेल्या कित्येक वर्षापासूनचा थकीत कर भरणा केला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळ पासूनच प्रत्येक थकबाकीदार यांच्याकडे जाऊन कर भरणा करा असे सांगूनही ज्यांनी कर भरणा केला नाही अशा पहिल्या टप्यात सर्व जागा भाडेकरू यांचे नळ कनेक्शन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तोडण्यात आले आहे .
ग्रामपंचायत मालकीचे असलेले जे व्यापारी गाळे आहे पैकी ज्या गाळे धारक भाडोत्री यांनी थकीत असलेल्या करांचा भरणा केलेला नाही अशा सर्व गाळे धारकांना ग्रामपंचायत कडून दि.३१ मार्च २०२१ पर्यंत कर भरणा करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत तरीही संबंधीत गाळे भाडोत्री यांनी मुदतीत थकीत करांचा भरणा केला नाही तर अशा गाळे धारकांना गाळ्याची आवश्यकता नाही असे गृहीत धरून पोलिस बंदोबस्तामुळे भाडोत्री असलेले गाळे ग्रामपंचायत कडून सील करण्यात येणार आहे.
आजच्या नळ तोडणी मोहीमे मध्ये ग्रामपंचायत चे लिपीक अमित पवार , रुपेश ओव्हाळ तसेच ग्रा.पं.शिपाई अक्षय सपकाळ , प्रमोद ठोंबरे , सायबू मुकने , पाणी पुरवठा कर्मचारी बिक्रांत गायकवाड, संतोष रेणुकर व सुनिल डांगे हे उपस्थित होते.
२७ नसरापूर
नळजोडणी तोडताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.