पाणीकपातीमधून दिलासा
By admin | Published: May 11, 2017 05:01 AM2017-05-11T05:01:32+5:302017-05-11T05:01:32+5:30
जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये खंड न पाडता १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले असून त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला प्रकल्पामध्ये ६.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ७.७० टीएमसी होता. एकाच आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी झाले आहे.
पुणेकरांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट अद्याप विदेश दौऱ्यावकून न परतल्याने पाण्यासंदर्भातील ११ मे रोजी होणारी आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. खडकवासला धरणात
असलेला पाणीसाठा पुरेसा असून पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोते यांनी सांगितले. सध्या पुण्याला दररोज १,३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दहा एप्रिलला झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये खडकवासला धरणात १०.२६ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोजचा पाणीवापर आणि उन्हाळी आवर्तनामुळे धरणात ६.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.