सुरक्षारक्षक भरती केवळ ठेकेदार पोसण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:11+5:302021-09-03T04:11:11+5:30

पुणे : महापालिकेतील सुरक्षारक्षक भरती ही केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी केली जात असल्याचा आरोप पतित पावन कामगार महासंघाने केला आहे. ...

Recruiting security guards only to feed the contractor | सुरक्षारक्षक भरती केवळ ठेकेदार पोसण्यासाठी

सुरक्षारक्षक भरती केवळ ठेकेदार पोसण्यासाठी

Next

पुणे : महापालिकेतील सुरक्षारक्षक भरती ही केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी केली जात असल्याचा आरोप पतित पावन कामगार महासंघाने केला आहे.

महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश मोटे यांनी याबाबत महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करावी व याकरिता भरती पुणे जिल्हा सुरक्षारक्षक महामंडळातर्फे करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महापालिकेतील सुरक्षारक्षक भरती सध्या वादाचा मुद्दा ठरली आहे. अशावेळी ही भरती महामंडळामार्फत केली तर त्यात पारदर्शकता येईल. तसेच महापालिकेवर होणारे आरोपांचे यातून खंडन होईल. परंतु महापालिकेने ही प्रक्रिया ठेकेदारांमार्फतच राबविली तर, केवळ राजकीय हेतूनेच हे काम केले जात असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे त्याविरोधात महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही मोटे यांनी सांगितले आहे. या वेळी अमित सोनार, रवींद्र भांडवलकर, राजेश मकवान, प्रसाद वाईकर उपस्थित होते.

---------

Web Title: Recruiting security guards only to feed the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.