नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

By admin | Published: November 24, 2014 11:29 PM2014-11-24T23:29:59+5:302014-11-24T23:29:59+5:30

नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.

Recurrence since 1st December from the Neera Canal | नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

Next
पुणो : नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. येथील जलसंपदा भवनात कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या कालव्याच्या लाभक्षेत्रतील आमदार म्हणून अजित पवार या बैठकीस उपस्थित होते.
पुरंदर, भोर, बारामती या तालुक्यांतून नीरा कालव्याचे लाभक्षेत्र आहे. पवार यांच्यासह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणो, भोरचे आमदार संग्राम थोपटे, तसेच अशासकीय सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पवार यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना केल्या. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे उपस्थित राहू शकले नाहीत. नीरा कालव्यातून निव्वळ सिंचनासाठी पाण्याचा उपसा होत असल्याने या बैठकीसाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता नसते, असे सूत्रंनी सांगितले.
28 फेब्रुवारीर्पयत प्रत्येकी 3 अब्ज घनफूट (टि.एम.सी)ची 2 आवर्तने सोडावीत असा निर्णय यावेळी घेण्यात आला. कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पवार उपस्थित झाल्याने जलसंपदा विभागातील अधिका:यांची काहीशी धांदल झाली.  दरम्यान, मुठा कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही.पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही बैठक होऊ शकेल.या कालव्यातील पाण्याचे नियोजन उद्योग, सिंचन आणि पिण्याचे पाणी यासाठी केले जात असल्याने शहरातील सर्व आमदारांसह लाभक्षेत्रतील आमदारांना निमंत्रित केले जाते.
 
भामा आसखेडच्या पाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
 भामा आसखेड धरणातून पुणो महानगरपालिकेस पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सिंचन पुनस्र्थापना खर्चापोटी महापालिकेने जलसंपदा विभागास 1क्क् कोटी रूपयांची मागणी केली आहे.मात्र महापालिकेने उत्पन्न नसल्याचे कारण दाखवित हा निधी देण्यास नकार दिल्याने हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित गेला आहे.उद्या मुंबईत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
महापालिका हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश होत असल्याने तसेचपालिका हद्दीजवळील 5 किलोमीटर र्पयतच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी पालिकेस सुमार े22.5क् टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे  महापालिकेस मुळशी धरणातूनही अतिरिक्त 5 टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली आहे.  याबाबतचे पत्र मंगळवारी, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

 

Web Title: Recurrence since 1st December from the Neera Canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.