पिंपळगाव जोगा धरणातून पाण्यासाठी आवर्तन
By admin | Published: March 26, 2016 02:59 AM2016-03-26T02:59:53+5:302016-03-26T02:59:53+5:30
पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आळेफाटा : पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे पाणी ओतूर व परिसरासह पूर्व भागातील पिंपरी पेंढार, आळेफाटा, राजुरी, बेल्हे व परिसरातील गावांसह शेजारील पारनेर तालुक्याला वरदान ठरले आहे. दुष्काळाची तीव्रता या भागातही वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने जनावरांचा पाण्याचा व चारा प्रश्न सोडवण्यासाठी पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे आवर्तन केव्हा सुटणार याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागले होते.
दरम्यान, काल (गुरुवार दि. २४) या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढणार आहे. धरणातील पाणीसाठा मर्यादित असल्याने हे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. आवर्तनाचे हे पाणी पारनेर तालुक्यातील मुख्य वडझिरे तलावापर्यंत जाणार आहे.