साेप्या प्रक्रीयातून पीअाेपीचा पुनर्वापर शक्य, तरुणांसाठी नवीन राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 06:27 PM2018-04-19T18:27:06+5:302018-04-19T18:27:06+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेणार अाहेत.
पुणे : प्लास्टर अाॅफ पॅरिस चा (पीअाेपीचा) पुनर्वापर करणे शक्य नसल्याने प्लॅस्टिकप्रमाणेच पीअाेपीमुळे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत अाहे. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशाेधकांनी अगदी साेप्या प्रक्रीयांद्वार या पीअाेपीच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान विकसीत केले असून त्याच्या उपयाेगाने पीअाेपी पासून निर्माण हाेणाऱ्या कचऱ्याची समस्या साेडवणे शक्य हाेणार आहे. त्याचबराेबर तरुणांना नवीन राेजगाराच्या संधी निर्माण हाेणार अाहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क मधील संशाेधक डाॅ. जयंत गाडगीळ व त्यांच्या सहकारी साेनाली म्हस्के यांच्या प्रयत्नातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. सायन्स पार्कने शाेधून काढलेल्या या प्रणालीनुसार पीअाेपी भाजणे, दळणे, चाळणे अशा साेप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्यास त्यापासून पुन्हा एकदा पीअाेपीच्या मूर्ती वा अन्य कलाकृती बनवता येणे शक्य असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. सायन्स पार्कच्या व्यतिरिक्त इतर काेणी पीअाेपीच्या पुनर्वापराचे तंत्र विकसित केले नसल्याचेही गाडगीळ यावेळी म्हणाले. सायन्स पार्ककडून गेल्या वर्षी प्रयाेगा दाखल एक टन पीअाेपीवर केलेल्या प्रक्रियेतून 800 किलाे पीअाेपी पुन्हा मिळविण्यात यश अाले आहे. हा प्रयाेग करण्यासाठी विद्यापीठाकडून छाेटेसे संशाेधन केंद्र तयार केले असून तेथे या पीअाेपीवर प्रक्रीया करण्यात येत अाहे. अगदी साेप्या पद्धतीने पीअाेपीचा पुनर्वापर करता येणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात अाले असल्याने तरुणांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन राेजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या अाहेत.
पुण्यातील नदीमध्ये गेल्यावर्षी किमान सहा लाख मूर्तींचे विसर्जन झाले. महाराष्ट्रात ही संख्या माेठी अाहे. त्यामुळे गणपती उत्सवानंतर या पीअाेपीमुळे हाेणाऱ्या प्रदुषणाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण हाेत असताे. पीअाेपी पाण्यात विरघळत नसल्याने नदीचे प्रदूषण वाढत असते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले संशाेधून उल्लेखीय अाहे. या प्रकल्पासाठी पाठबळ देऊ शकणाऱ्या संस्था, गणेशमंडळे यांच्याशी संपर्क करुन या प्रक्रियेचा माेठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी अार्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.