पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:38 AM2020-08-07T05:38:13+5:302020-08-07T05:38:37+5:30

पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या ‘जेके’ ट्रस्टमधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला.

Red buffalo born with test tube technology! | पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!

पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!

googlenewsNext

पिंपरी (पुणे) : टेस्ट ट्यूब अर्थात इन विट्रो फर्टिलायझेन (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाने म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणे फार्ममध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दुभत्या म्हशींच्या संख्येमध्ये वाढ करण्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या ‘जेके’ ट्रस्टमधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला. सोनवणे बफेलो फार्ममध्ये ४ म्हशींपासून मुºहा जातीच्या पाच रेडकांचा जन्म झाला आहे. जेके ट्रस्टने २०१७ साली आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गायीपासून वासरू जन्माला घातले. त्यानंतर म्हशीतील गुंतागुंतीची प्रक्रियाही यशस्वी केली आहे. जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर म्हणाले, भारतामध्ये १० कोटी ९० लाख म्हशी आहेत. ही संख्या जगातील एकूण म्हशींच्या ५६ टक्के इतकी आहे. म्हशींमध्ये मुºहा ही जात नामांकित मानली जाते. या म्हशीमध्ये असिस्टिड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) वापरून अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट म्हशींची पैदास करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर दूध देणारी जनावरे उत्पादित करता येतील.

काय आहे आयव्हीएफ?
मानवामध्येही इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) माध्यमातून आपत्य प्राप्ती केली जाते. या पद्धतीत स्त्री बिजांड प्रयोगशाळेत फलित केला जातो. सात दिवसांचा गर्भ दुसºया म्हशीमध्ये रोपण केला जातो. हा गर्भ माणसाच्या केसाच्या अग्रा इतका लहान असतो. या पद्धतीमुळे चांगले दूध देणाºया म्हशींचा अनुवंश आपल्याला वाढविता येऊ शकतो. कृत्रीम रेतन पद्धतीत उत्तम प्रतीच्या रेड्यांचे गोठवलेले वीर्य म्हशीमध्ये रेतन केले जाते. या पद्धतीमध्ये लहानसा गर्भ म्हशीमध्ये रोपण केला जातो, असे डॉ. झंवर म्हणाले.

Web Title: Red buffalo born with test tube technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे