पुण्याच्या ‘रेड लाईट’मधील चिमुरड्यांना आईच्या कुशीची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:10 AM2019-02-19T02:10:29+5:302019-02-19T02:11:40+5:30
पोलिसांच्या जागत्या पहाऱ्यामुळे शांतता : मुलांना नाईट शेल्टरमध्ये ठेवण्याचे प्रमाण कमी
विवेक भुसे
पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पोलिसांनी जागता पहारा सुरू केल्याने तेथील भांडणे, मारामाºया बंद होऊन शांतता निर्माण झाली. तसेच, पोलिसांनी धाकदपटशा न दाखवताही घातलेल्या बंधनांमुळे वेश्यांच्या मुलांना नाईट शेल्टरमध्ये ठेवण्याचे प्रमाण कमी झाले असून, आईच्या कुशीची ऊब मिळू लागली आहे.
बुधवार पेठेत रात्री ११ पासून पहाटेपर्यंत नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. रात्री या परिसरात येणाºया वाहनचालकांची तपासणी होत आहे. पोलिसांकडून चौकशी होत असल्याने तेथे येणाºयांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे रात्रभर रस्त्यावर उभे राहून वेश्याव्यवसाय करणाºया तरुणींनाही प्रतिबंध झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम या वेश्यांच्या मुलांवर झाला आहे. रात्रभर आईला सोडून नाईट शेल्टरमध्ये राहण्याची वेळ अनेक मुलांवर येत होती. त्यांना आता आईसोबत राहता येऊ लागले आहे.
या परिसरात गुन्हेगार, दारूडे यांच्या वावरामुळे किरकोळ भांडणे, मारामाºया, चोºया होत होत्या. पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन सातत्याने खणखणत असे़ पोलिसांनी येणाºया कॉलचा अभ्यास करून उपाययोजना केल्या़ त्यामुळे कॉल येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले, की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू होता़ येथे २ हजारांहून अधिक महिला आहेत़ याशिवाय रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाºया सुमारे २ हजार तरुणी, महिला येथे येत असत़ त्यातून येणाºया-जाणाºयांना छेडणे, गरीब तरुणांना लुटण्याचे प्रकारही होत होते़ त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवार पेठ, रविवार पेठ, फडगेट, मंडई पोलीस चौकीतील मार्शल अशा चार ठिकाणी नोव्हेंबर व डिसेंबर २०१८मध्ये दिवसा व रात्री किती कॉल येतात, याची माहिती घेतली़ हे कॉल नेमके कोणत्या कारणासाठी येतात आणि नेमके कोणत्या स्थानावरून येतात, याचा अभ्यास केला़ त्यातून सर्वप्रथम येथे व्यवसाय करणाºया तरुणी, महिलांची संपूर्ण यादी तयार केली़ त्यांच्याव्यतिरिक्त रात्री येथे येणाºया व रस्त्यावर उभ्या राहणाºया तरुणींना प्रतिबंध केला़
या महिलांकडे येणाºया ग्राहकांचा अभ्यास केला़ त्यांचा वयोगट, त्यांची परिस्थिती यांची माहिती घेतली़ त्यात अगदी झोपडपट्टीपासून आयटी पगारदारांपर्यंत सर्व जण येथे येत असल्याचे आढळून आले़ बाहेरून येणाºया तरुणींना प्रतिबंध केल्याने रस्त्यावर थांबून होणारा व्यवसाय थांबला़ अनेकदा चार तरुण जमले, दारू प्यायले की रात्री उशिरा मौजमजेसाठी तर काही जण केवळ गंमत म्हणून या परिसरात फिरायला येऊन टिंगळटवाळी करीत असत़ त्यातून भांडणे, छोट्या-मोठ्या मारामाºया होत़ अशा आगंतुकांना या नाकाबंदीत प्रतिबंध केला जाऊ लागला़ त्यामुळे पुढे अशा तरुणांचा वावर कमी झाला़ पोलिसांचा जागता पहारा पाहून गुन्हेगारांचेही इकडे फिरकणे कमी झाले़ परिणामी भांडणे, मारामाºया कमी झाल्या़ कामाशिवाय येणाºयांची संख्या घटल्याने लुटण्याचे प्रमाण, चोºया यांची संख्यादेखील आता घटली आहे़
चिमुरड्यांनाही मिळू
लागला आईचा सहवास
1 रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदीचा परिणाम झाला आहे़ वेश्याव्यवसाय करणाºया महिलांच्या ५ वर्षांखालील मुलांसाठी येथे नाईट शेल्टर स्वयंसेवी संस्थेने सुरू केले आहे़ तेथे अनेक महिला आपली मुले रात्रभर ठेवत असत व सकाळी घेऊन जात. आता मात्र रात्री येथे येणाºया मुलांमध्ये ५० टक्के घट झाली आहे़
2 ही मुले आता रात्री आईकडेच असतात़ त्यांनाही कौटुंबिक वातावरण अधिक काळ मिळू लागले आहे़ सकाळी आई स्वत: या मुलांना शाळेत पाठवू लागली आहे. या स्वयंसेवी संस्थेने नुकत्याच घेतलेल्या स्रेहमेळाव्यात ही बाब महिलांनी आवर्जून सांगितल्याचे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़
वेश्याव्यवसाय चालणाºया या भागात बाहेरून येणाºया तरुणींना प्रतिबंध केला; त्याचबरोबर रात्री ११ नंतर पोलिसांचा जागता पहारा ठेवून परिसराची नाकाबंदी केली़ त्यामुळे टिंगलटवाळी करणाºयांची संख्या घटल्याने त्यामुळे होणाºया चोºया, मारामाºया कमी झाल्या असून, मागील दोन महिन्यांच्या तुलनेत जानेवारी २०१९मध्ये तब्बल ६५ कॉल कमी झाले आहेत़
- सुहास बावचे,
पोलीस उपायुक्त