लालपरी रस्त्यावर... पण प्रवाशांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:18 AM2017-10-22T02:18:57+5:302017-10-22T02:18:59+5:30
एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे.
पुणे : एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे.
शिरूर : ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचारी आज कामावर रुजू झाले. मात्र, प्रवाशांनी संपाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे आज शिरूर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी जाणवली. दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी याच स्थानकावर उभे राहायला जागा नसते. एसटी बसेसही प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसतात. आज मात्र ती परिस्थिती जाणवली नाही.
न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना संप मागे घ्यावा लागला. सोशल मीडियावर ही वार्ता वाºयासारखी पसरली. आज सकाळी सर्वसामान्यांची लाल-पिवळी एसटी बस स्थानकात फलाटावर लागण्यास सुरुवात झाली. हताश झालेल्या चेहºयांनी वाहक-चालकांना कामावर रूजू व्हावे लागले. मात्र, आज सकाळपासूनची परिस्थिती पाहता दरवर्षी भाऊबीजेला प्रवाशांनी खचाखच भरलेले शिरूर बसस्थानिक बºयापैकी मोकळे जाणवले. दुपारनंतर यात थोडी वाढ होत गेली.
तरीही दरवर्षी दिसून येणारी प्रवाशांची झुंबड यावर्षी जाणवली नाही. एसटी बसेस मात्र दररोजच्या वेळापत्रकानुसार फलाटावर
लागत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी पुण्याला जाणाºया बसेसमध्ये
उभे राहायला जागा मिळणे देखील कठीण जाते. आज मात्र
बसेस नेहमीप्रमाणे भरलेल्या दिसत होत्या. अनेक बसेसमध्ये
उभा राहिलेला प्रवाशीच आढळला नाही.
>घोडेगावला शुकशुकाट
घोडेगाव : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात एसटी धावली. चार दिवस शुकशुकाट असलेल्या घोडेगावच्या बसस्थानकात भाऊबीजेच्या दिवशी गजबज दिसून आली. एसटी येत होत्या व भरून भरून जात होत्या.
एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले. पूर्णत: एसटीवर अवलंबून असलेल्या लोकांनी गावातून बाहेर पडणे टाळले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात अजूनही एसटीशिवाय पर्याय नाही.
एसटीच्या संपामुळे अनेक लोक गावातच थांबून राहिले होते. भाऊबीजेला संप मिटावा, अशी सर्वांची अपेक्षा होती, त्याप्रमाणे आदल्या दिवशी रात्रीच संप मिटला व एसटी गाड्या भाऊबीजेला रस्त्यावरून धावू लागल्या.
भाऊबीजेच्या दिवशी घोडेगाव बसस्थानकात गर्र्दी दिसली. बाहेरगावी जाण्यासाठी अनेक प्रवासी एसटीची वाट पाहत होते. येणारी प्रत्येक गाडी भरून जात होती. एसटीचा संप मिटल्याचा अनेकांनी आनंद व्यक्त केला. बारामती : एसटी कर्मचाºयांचा संप चौथ्या दिवशी मिटला असला तरी बसस्थानकांवरील प्रवाशी संख्या मात्र रोडावली आहे. भाऊबीजच्या दिवशी एसटी प्रशासनावर अतिरिक्त प्रवाशी संख्येचा ताण असतो. मात्र संप मिटल्याचे अनेकांना ठाऊक नसल्याने अनेक बसगाड्या अवघ्या चार-पाच प्रवाशांना घेऊनच धावत असल्याचे चित्र बारामती बसस्थानकात दिसत होते.
आज सकाळपासुन एसटी सेवा पुर्ववत झाली.मात्र, याबाबत अनेकांना माहिती नव्हती.त्यामुळे दिवाळी,भाउबीज सणाच्या तुलनेने गर्दीचे प्रमाण आज एसटीबसमध्ये प्रवाशांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसुन आले.एसटी संप सुरुच असल्याच्या भावनेतुन अनेकांनी बाहेर गावी प्रवासाला जाणे टाळले.तर काहींनी एसटी बसला रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला.
दरम्यान,२४ दररोज ३१० फेºया होणारा बारामती आगाराच्या शनिवारी (दि. २१) २५९ फेºया झाल्या. संपामुळे रात्री मुक्कामी थांबणाºया बस गेल्या नसल्याने फेºयांची संख्या कमी झाल्या आहेत. पुढील २४ तासात परिस्थिती पूर्ववत होईल, असे बारामती आगारचे प्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी सांगितले.