स्वयंपाकाच्या गॅसचा भडकता दर कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:00+5:302021-01-15T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वयंपाकाचा गॅस तसेच पेट्रोल, डिझेल या इंधनाचे भडकलेले दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वयंपाकाचा गॅस तसेच पेट्रोल, डिझेल या इंधनाचे भडकलेले दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याची टीका या वेळी करण्यात आली.
समितीच्या अध्यक्ष डॉ. फय्याज शेख तसेच अॅड. विद्या पेळपकर, अॅड. राजश्री आडसूळ, अॅड. पुष्पा लोंढे, अॅड. सुरेश खुर्पे, भोला वांजळे, मनोहर गाडेकर, अॅड. रमेश माने, योगेश भोकरे, विक्रांत धोत्रे, वीणा कदम, सिकंदर शेख यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शेख म्हणाल्या की, कोरोना टाळेबंदीत रोजगार गमावलेला कष्टकरी तसेच नोकरदार वर्ग वाढत्या महागाईमुळे चिंतीत झाला आहे. घर चालवायचे कसे असा प्रश्न त्याच्यापुढे आहे. कर्ज घेतलेल्यांना त्याचे हप्ते देणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने अत्यावश्यक गोष्टींचे दर नियंत्रणात ठेवायला हवे.
-------------------------------------
तानाजी कांबळे यांचा गौरव
पुणे : पीएमपीएलमधील वाहक तानाजी कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले जागृती महिला मंच व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्त्या राखी रासकर व भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी कांबळे यांचा गौरव केला.