समुपदेशन, जनजागृती अन् औषधांमुळे शहरातील एड्सग्रस्तांची घटली संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:32 PM2019-11-30T13:32:27+5:302019-11-30T13:39:21+5:30

आजाराची बाधा होणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांची संख्या लक्षणीय

Reduced number of AIDS sufferers in the city due to counseling, awareness and medicine | समुपदेशन, जनजागृती अन् औषधांमुळे शहरातील एड्सग्रस्तांची घटली संख्या

समुपदेशन, जनजागृती अन् औषधांमुळे शहरातील एड्सग्रस्तांची घटली संख्या

googlenewsNext
ठळक मुद्देपालिकेकडून जनजागृती : एड्स दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजनहा आजार होण्यामध्ये कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक गटांतील नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण २०१६ च्या तुलनेत २०१९ पर्यंत एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली

पुणे : जनजागृती, समुपदेशन आणि औषधांच्या नियमित सेवनामुळे महापालिका हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. २०१६ च्या तुलनेत २०१९ पर्यंत एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. आजाराची बाधा होणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांची संख्या लक्षणीय आहे. जनजागृती, समुदेशन आणि वारंवार केली जाणारी रक्तचाचणी यामधून बाधितांची संख्या कमी होण्यास मदत मिळाल्याचे वैद्यकीय अधिकारी तथा समन्वय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
हा आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण अल्प उत्पन्न गटातील तसेच कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक अशा गटांतील नागरिकांचे आहे. पालिकेकडून ‘हाय रिस्क’ गटातील लोकांची वारंवार एचआयव्ही तपासणी, रक्त तपासणी केली जाते. यासोबतच त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. पालिकेकडून दर ६ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने एड्सविषयक जनजागृतीकरिता समुपदेशकांची नियुक्ती केली जाते. देहविक्रय करणाºया स्त्रियांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, या स्त्रियाच अधिक जागरूक असल्याचे आणि असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापासून परावृत्त झाल्याचे पालिकेच्या पाहणीमधून समोर आले आहे. 
तपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच, तर तातडीने उपचार सुरू केले जातात. रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर आणि सहकारी अशा घटकांचीही तपासणी करण्यात येते. 
.......
१ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम : मॅरेथॉन, सायकल रॅली अन् पथनाट्य
पालिकेकडून १ डिसेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
४सायकल रॅली, मॅरेथॉन, डिस्प्ले व्हॅनद्वारे जागृती, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन, गटचर्चा, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती, निबंध,पोस्टर्स व भाषण स्पर्धा, वेश्यावस्तीतील महिलांसाठी मेळावा, युवक-युवती मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन क रण्यात आल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले. 
.........
एड्सबाधितांची आकडेवारी
    2016    2017    2018    2019 
पुरुष    974    740    873    748
महिला    751    569    689    558
मुले    26    21    04    12
मुली    15    17    08    06
तृतीयपंथी    02    08    13    10
गर्भवती    60    08    46    43
खासगी रुग्णालये    —    —    73    129
..........
वर्ष    प्रकार    पुरुष    महिला    मुले     मुली    तृतीयपंथी    गर्भवती    एकूण
2016    समुपदेशन     35, 132    24, 528    616    204    204    32, 342    93, 316
    रक्तचाचणी    30, 390    24, 370    616    504    204    31, 389    87, 923
2017    समुपदेशन    36, 327    21, 016    700    573    142    30,843    89,601
    रक्तचाचणी    30, 924    20, 801    698    569    129    29, 652    82, 773
2018    समुपदेशन    40, 992    24, 467    995    486    21    31, 640    98, 601
    रक्तचाचणी    35,339    24,082    962    464    21    30,450    91, 318
2019    समुपदेश    35,512    19,897    656    422    114    25,982    82,583
    रक्तचाचणी    33,808    19,318    645    416    113    25,282    79,384
....

Web Title: Reduced number of AIDS sufferers in the city due to counseling, awareness and medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.