लोकमत मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:48+5:302020-12-04T04:27:48+5:30
पुणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची... आईला एकुलता एक...वडीलांचे लहानपणीच छत्र हरपलेले. आर्थिक हातभार लागावा म्हणून डिलिव्हरी बॉयचे काम ...
पुणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची... आईला एकुलता एक...वडीलांचे लहानपणीच छत्र हरपलेले. आर्थिक हातभार लागावा म्हणून डिलिव्हरी बॉयचे काम स्वीकारले. मात्र काळाचा घात झाला. पायाला अपघात झाला. त्यामुळे तब्बल १८ महिने एकाच जागी बसून राहावे लागले. हातचे काम गेल्याने आर्थिक अडचणींना तोंड कसे द्यावे. असा प्रश्न अक्षय वसंत पोळके (रा. ताडीवाला रस्ता) याला पडला असून आर्थिक मदतीचा हात हवा आहे.
अपघातात उजव्या पायाला मार लागल्याने तब्बल पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पायामध्ये प्लेट बसवली असून अंगठ्याच्या शेजारील बोट तुटले आहे. या शस्त्रक्रियेला आता पर्यंत सुमारे १० लाखांचा खर्च झाला आहे. मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी यांची मदत झाली. मात्र आता ही मदत अपुरी पडत आहे. पुढील शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने अक्षय आर्थिक संकटात सापडला आहे. पायातली प्लेट काढली तर त्याला नवीन नोकरी मिळण्याची आशा आहे. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने घरात बसून रहावे लागत आहे. असे अक्षयने लोकमतला सांगितले.
अनेकांकडे मदतीची मागणी करूनही मदत मिळत नाही. लवकरात लवकर मदत मिळाली तर पायावर आणि बोटावर होणारी शस्त्रक्रिया पार पडेल. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानानाने पुन्हा जगायचे आहे. असे अक्षयचे म्हणणे आहे.
मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र , संगमवाडी, (ढोले पाटील रस्ता.)
बचत खाते
खाते क्रमांक 60153881134
आय एफ सी कोड :- MAHB0000822