ऊसवाहतूक गाड्यांना रिफ्लेक्टर बसवा

By Admin | Published: February 5, 2016 02:20 AM2016-02-05T02:20:36+5:302016-02-05T02:20:36+5:30

यमदूत बनलेल्या ऊस वाहतुकीच्या टॅ्रक्टर-टेलरला चाप लावण्यात कारखाने अपयशी झाले असले, तरी आता साखर आयुक्तांनीच याबाबत कारवाईचा बडगा उगारला

Reflectors should be used for carcasses | ऊसवाहतूक गाड्यांना रिफ्लेक्टर बसवा

ऊसवाहतूक गाड्यांना रिफ्लेक्टर बसवा

googlenewsNext

सोमेश्वरनगर : यमदूत बनलेल्या ऊस वाहतुकीच्या टॅ्रक्टर-टेलरला चाप लावण्यात कारखाने अपयशी झाले असले, तरी आता साखर आयुक्तांनीच याबाबत कारवाईचा बडगा उगारला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यानंतर अर्जाची दखल घेत, त्यांनी राज्यातील कारखान्यांना प्रत्येक ट्रॅक्टर-टेलर, ट्रक व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर व रिफ्लेक्टिव टेप बसविण्याचे परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.
राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यानंतर, साखर कारखाना कार्यक्षेत्रात उसाची वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-टेलर व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर नसल्याकारणांनी परिसरातील नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत
आहेत. तसेच, याबाबत संबंधित कारखानेही कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे. कारखान्यांनी व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित कारखान्यांवर कॅम्प
घेऊन उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना रिफ्लेक्टर बसविण्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे आणि जे वाहनचालक रिफ्लेक्टर बसविण्याबाबत टाळाटाळ करतात, अशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
साखर कारखान्यांच्या परिसरात रात्रीच्या वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना उसाने भरलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होतात. यामध्ये अनेकांना आपला प्राणही गमवावा लागतो.
याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने साखर आयुक्तांना पत्र पाठवित ही बाब निदर्शनास आणून देऊन, याबाबत आपण काय कारवाई केली, असे विचारले होते.
यावर साखर संचालकांना प्रादेशिक सह
संचालक यांना आदेश देऊन याबाबतचे परिपत्रकच काढले आहे. तसेच, प्रादेशिक सह संचालकांबरोबरच राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनाही परिपत्रक पाठवून याबाबत
तत्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Reflectors should be used for carcasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.