वीजग्राहकांना मिळेल परतावा
By admin | Published: June 25, 2017 04:46 AM2017-06-25T04:46:22+5:302017-06-25T04:46:22+5:30
महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील २५ लाख ९० हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार ४९ कोटी ६९ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील २५ लाख ९० हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार ४९ कोटी ६९ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. गेल्या एप्रिलपासून ते जून महिन्यातील वीजदेयकांत ही रक्कम समायोजित करण्यात येत आहे.
या ठेवीवर कालावधीनुसार बँकेच्या बेस रेटनुसार व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागांतील लघुदाब वर्गवारीमधील घरगुती २१ लाख ६५ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी ९३ हजार रुपये, वाणिज्यिक २ लाख ६१ हजार ग्राहकांना ९ कोटी ५ लाख रुपये, औद्योगिक ३७,४६१ ग्राहकांना ५ कोटी १२ लाख रुपये, कृषीपंपधारक १ लाख ९ हजार ग्राहकांना २ कोटी ४१ लाख रुपये तसेच इतर १८ हजार ग्राहकांना १ कोटी १८ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.
त्यामुळे ग्राहकांच्या बिलामध्ये सवलत मिळणार आहे. त्या सवलतीमुळे ग्राहकांना काही दिवस विजेची बिले कमी प्रमाणात येतील, अशी ग्राहकांची भावना आहे.