विकास आराखडा पुन्हा तयार करा
By Admin | Published: February 19, 2015 01:06 AM2015-02-19T01:06:51+5:302015-02-19T01:06:51+5:30
पुन्हा दुरूस्ती करून सुधारीत विकास आराखडा सादर करण्याची शिफारस नियोजन समितीमधील शासन नियुक्त सदस्यांनी केली आहे.
पुणे : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यात गंभीर चुका असून, त्यात पुन्हा दुरूस्ती करून सुधारीत विकास आराखडा सादर करण्याची शिफारस नियोजन समितीमधील शासन नियुक्त सदस्यांनी केली आहे.
हा आराखडा तयार करताना, अस्तित्वातील जागा वापर (इएलयु), भविष्यातील प्रस्तावित जागा वापर (पीएलयु) यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. शहराशी निगडीत असलेले वाहतूक, पाणी, घनकचरा, तसेच पर्यावरणाशी संबधित अनेक घटकांचा समावेश नसल्याने पुढील २० वर्षात या आराखड्यामुळे शहराचा असंतुलित विकास होण्याची भीती या सदस्यांनी व्यक्त केली आहे. या आराखड्यावर आलेल्या तब्बल ८७ हजार हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या समिती सदस्यांमध्ये फूट पडली असून, दोन स्वतंत्र अहवाल सादर केले आहेत. त्यातील सारंग यादवाडकर, सचिन चव्हाण आणि अख्तर चौहान या तीन सदस्यांनी सादर केलेल्या अहवालात विकास आराखडा सुधारीत करण्याची शिफारस केली आहे.
या समिती सदस्यांच्या अहवालानुसार, विकास आराखडा तयार करताना, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत तो गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक करणे याचा अभ्यास योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागाही अपुऱ्या आहेत. या शिवाय रस्ता रूंदीकरण, नवीन रस्त्यांची आखणी, काही ठिकाणी अनावश्यक रस्ता रूंदीकरण करण्यात आल्याने त्याचाही अभ्यास झाला नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय आराखड्यात पूररेषेचा समावेश नसल्याने तसेच ग्रीनबेल्टमध्ये अनेक ठिकाणी बांधकामे असल्याने आणि त्या ठिकाणी निवासीकरण दाखविण्यात आल्याने त्याचाही अभ्यास न करताच या बाबी प्रस्तावित करण्यात आल्याचा आक्षेप या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
आरक्षण प्रकारनिकष आरक्षित निकषानुसार
(लोकसंख्येनुसार) जागा आवश्यक
बस टर्मिनल१ लाखांमागे १५१३
पोलीस ठाणे९० हजार मागे १३३७
प्राथमिक शाळा५०० मुलांमागे १२८११८
माध्यमिक शाळा१००० मुलांमागे १२९२१६
नर्सिंग होम२५ हजार मागे १४१३
दवाखाना२५ हजार मागे ११७
खेळाची मैदाने१ हजार व्यक्तींमागे (०.४ हेक्टर ) १३७४७७