अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करा घराची नोंदणी; सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 09:16 AM2023-04-21T09:16:15+5:302023-04-21T09:22:32+5:30

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवार २२ एप्रिल आणि रविवार २३ एप्रिल रोजी शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार

Register the house on the auspicious occasion of Akshaya Tritiya; With the secondary registrar offices open | अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करा घराची नोंदणी; सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करा घराची नोंदणी; सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

googlenewsNext

पुणे : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशी 22 एप्रिल रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी-विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठरावीक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुरू ठेवावयाची कार्यालये निश्चित करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांच्या सह जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.

शहरात ५ कार्यालये राहणार सुरू

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवार २२ एप्रिल आणि रविवार २३ एप्रिल रोजी शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. १७ आणि युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २२ ही कार्यालये दुपारी १ ते रात्री ८.४५ वा., युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २१ आणि सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २५ ही कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी ३.३५ वा. पर्यंत, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २३ कार्यालय सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ वा. पर्यंत सुरू राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Web Title: Register the house on the auspicious occasion of Akshaya Tritiya; With the secondary registrar offices open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.