मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:09 PM2021-04-07T14:09:04+5:302021-04-07T14:10:09+5:30

पुणे, मुंबईसह राज्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय....

Registration in the state's 'Live and License' document office is closed till the end of April | मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद 

मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद 

Next
ठळक मुद्देआगाऊ अपॉईंमेंट असेल तर होणार दस्त नोंदणी 

पुणेपुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु अद्यापही सर्वच मोठ्या शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दस्त नोंदणी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच राज्यातील लिव्ह अँड लायसन दस्तांची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेर पर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच नियमित दस्त नोंदणीसाठी देखील अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

नोंदणी महानिरीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार, सदयस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. या ऑनलाईन सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. याशिवाय काही सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून , त्याचा वापर करुन दस्त नोंदणीसाठी यावे व  शासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.
आता दस्त नोंदणीसाठी असतील हे निर्बंध 
*  नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE ब्दारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत.
* नागरीकांनी सदर PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर eStep-in या प्रणालीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष सपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे . कोणत्याहीऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष सपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे कोणत्याही परिस्थीतीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
* नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सहयांसाठी स्वतःचे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित बेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. 
*विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई -रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी ( फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे. 

* सदयस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा.मुंबई ठाणे पुणे व इतर ठिकाणी सकाळ दुपार दोन सत्रात कार्यालये सूरु आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या टिवशी सूरु होते त्याचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत असून त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सूरु राहील.

Web Title: Registration in the state's 'Live and License' document office is closed till the end of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.