अंगणवाडीतार्इंचा थाळीनाद, मिनी अंगणवाडी नियमित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:12 AM2018-08-11T01:12:46+5:302018-08-11T01:12:59+5:30
‘२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा आदेश रद्द करा, लाईन लिस्टिंग आधार नोंदणीची सक्ती रद्द करा.
पुणे : ‘२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा आदेश रद्द करा, लाईन लिस्टिंग आधार नोंदणीची सक्ती रद्द करा... आदी मागण्या करीत अंगणवाडीसेविकांच्या एकजुटीचा विजय असो... हमारी युनियन, हमारी ताकद...’ अशा घोषणा देत शुक्रवारी सुमारे दोन हजार अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे प्रशासनाला देण्यात आला.
अंगवाडीसेविकांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे अनेक सुविधांना अंगणवाडीसेविका आणि कर्मचारी वंचित असल्याचा आरोप यावेळी महराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश दातखिळे यांनी केला. आज महिला आणि बालविकास विभाग आयुक्त आणि जिल्हा परिषदेसमोर आज थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सकाळी १२ वाजता सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. येथून थाळीनाद मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सर्व आंदोलकांनी महिला आणि बाल कल्याण आयुक्तालयापुढे ठिय्या दिला. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप हिवराळे यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी हिवराळे यांनी राज्य स्तरावरील मागण्या या शासनस्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच, जिल्हास्तरीय मागण्या या जिल्हा प्रशासनस्तरावर सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर मोर्चा हा जिल्हा परिषदेवर वळविण्यात आला. सर्व आंदोलकांनी घोषणाबाजी करीत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे धरले. या वेळी त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, महिला आणि बाल कल्याण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, सदस्य विठ्ठल आव्हाळे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले तसेच मागण्या पूर्ततेचे आश्वासन दिले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सहसचिव विठ्ठल करंजे, सविंद्रा बोºहाडे, सुमन फदाले, शैलजा कोरहळे, शारदा शिंदे, अनिता गुंजाळ, सरला उडणे, नयना वाळुंज, सीता मिसाळ, छाया भुजबळ, सुरेखा शिनगारे, भाग्यश्री जोशी, रंजना कानडे, शहेनाज पठाण, बिल्कीज काझी, रशीदा बेग, शाहीन आरकाठी, सुरेखा कारंडे, नीता पायगुडे, बिस्मिल्ला तांबोळी, संगीता रायकर, सविता रायकर, शिवरकरताई, रेश्मा शिंदे, स्वाती भेगडे, सारिका रूपवते, उज्ज्वला देडगे, सुनीता लोंढे, गजगजताई, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे तसेच सर्व बीट प्रतिनिधी उपस्थित होत्या.
>२५ पेक्षा कमी मुले असतील, तर ती अंगणवाडी केंद्रे बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रांत समाविष्ट करण्याचा आदेश रद्द करावा.लाईन लिस्टिंगच्या व आधार नोंदणीच्या
कामाची सक्ती
बंद करा. नगरपालिका
आणि महापालिकांकडे अंगणवाडी केंद्रांचे होणारे हस्तांतर आदेश रद्द करण्यात यावा. मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करा. अंगणवाडी केंद्रांचे भाडे नवीन जीआर प्रमाणे द्या, बचत गटाची आहाराची बिले व फेडरेशनअंतर्गत आहारातील थकीत इंधन बिले देऊन, इंधन दरात वाढ करा.सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, एकरकमी सेवासमाप्तीच्या लाभाची रक्कम तातडीने जमा करा.
>अंगणवाडीसेविकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील २५ पेक्षा कमी पटसंख्या असणाºया अंगणवाड्या बंद करण्यात येणार नाहीत. तसेच, पोषण आहाराच्या इंधनदर ५० पैशांवरून ६५ पैसे करण्यात येईल. याचबरोबर सेवानिवृत्त एकरकमी लाभाचे १३५ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. - राणी शेळके,
सभापती महिला आणि बालकल्याण विभाग