प्रकल्पबाधीत विस्थापितांचे पुनर्वसन मोठे आव्हान - भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:18 AM2018-05-07T04:18:07+5:302018-05-07T04:18:07+5:30
राज्यात कोयना प्रकल्पापासूनचे पुनर्वसन रखडले असून विस्थापितांचे पुनर्वसन करणे हे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीपुढील मोठे आव्हान असणार आहे, असे मत समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
पुणे - राज्यात कोयना प्रकल्पापासूनचे पुनर्वसन रखडले असून विस्थापितांचे पुनर्वसन करणे हे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीपुढील मोठे आव्हान असणार आहे, असे मत समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
विदिशा विचार मंचतर्फे ‘भूमिका’ या कार्यक्रमांतर्गत भांडारी यांची ममता क्षेमकल्याणी यांनी मुलाखत घेतली. भांडारी म्हणाले, पुनर्वसनात होणाऱ्या दिरगांईमुळे विकास प्रकल्पांना विरोध होतो. नाणार प्रकल्पाला होणारा विरोध हा त्याही कारणामुळे असू शकतो. नाणारच्या बाबतीत सुधारित कायद्यान्वये जमीन संपादन होणार असल्याने त्याचे थेट फायदे जमीन मालकांना मिळतील. अलीकडे प्रकल्पग्रस्तांची तोंडदेखली बाजू घेऊन संघर्षासाठी संघर्ष, अशी भूमिका घेतली जाते. प्रश्न किचकट करण्यापेक्षा तो सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक मानसिकाता ठेवली तर प्रश्न संपू शकतील, असे ते म्हणाले.