दोन वर्षांपासून कोंढारीचे पुनर्वसन प्रलंबित : थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:21+5:302021-07-26T04:09:21+5:30

भोर- महाड रस्त्यावरील शिरगाव, वारवंड, कारुंगण,हिर्डोशी व रिंगरोडवरील कंकवाडी व पऱ्हर येथील दरडी पडून रस्ता बंद झालेल्या भागाची व ...

Rehabilitation of Kondhari pending for two years: Dots | दोन वर्षांपासून कोंढारीचे पुनर्वसन प्रलंबित : थोपटे

दोन वर्षांपासून कोंढारीचे पुनर्वसन प्रलंबित : थोपटे

Next

भोर- महाड रस्त्यावरील शिरगाव, वारवंड, कारुंगण,हिर्डोशी व रिंगरोडवरील कंकवाडी व पऱ्हर येथील दरडी पडून रस्ता बंद झालेल्या भागाची व शेतीच्या नुकसानीची पाहणी केली केली. त्यावेळी आमदार थोपटे बोलत होते. या वेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतीचे पंचनामे करण्याचे व दरडी पडलेल्या रस्त्याची कामे लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी उपविभागीय आधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, कृषी अधिकारी हिरामन शेवाळे, उपअभियंता

संजय वागज, शाखा अभियंता सदानंद हल्लाळे,आनंदराव आंबवले,सुरेश राजिवडे,किसन कंक,विजय शिरवले,लक्ष्मण दिघे,विष्णु मळेकर,संजय मळेकर,भाऊ परखंदे,बाळासो मालुसरे,संतोष दिघे,बबन मालुसरे,शिवाजी सासवडे,मारुती कोंढाळकर,नितीन पारठे,बबन धामुणसे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले, कोंढरी गावात २०१९ साली कोंढरी गावाजवळच्या डोंगरात भूस्खलन झाले. त्या वेळी लोकांचे शाळा,अंगणवाडीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.त्यानंतर शासनाला आपत्तीकालीन मधुन पुर्नवसनासाठी प्रस्ताव दाखल केला होता.तातपुरती निवारा शेड करण्याची मागणी केली होती.त्याचा पाठपुराव करतोय मात्र पुर्वी या गावाचे पुर्नवसन झाले असल्याचे सांगून पुर्नवसन प्रस्ताव रखडला होता.

वास्तविक पाहाता, कोंढरी येथील ४० कुटुंबापैकी पैकी १७ जणांचीच जमिन निरादेवघर धरणात गेली होती. मात्र अदयाप त्यांना पुर्नवसन मिळालेले नाही आणी भुस्कलन झालेल्या मुळ कोंढरी गावातील लोकांचे पुर्नवसन अदयाप झालेले नाही.लोकांची शासनाकडुन चेष्ठा सुरु असुन कोंढरी गावचे माळीण होण्याची वाट शासन पाहात आहे का असा सवाल आमदार थोपटे यांनी केला आहे.

कोंढरी गावातील नागरीकांना दरवर्षी पावसाळयात धोका होऊ नये म्हणून लहान मुलांसह अबाल वृध्दांना त्यांच्या संसारासह गावाबाहेर सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे लागते आणी पावसाळा संपला कि पुन्हा गावात येतात दरवर्षी याचा नागरिकांना त्रास होतो.त्यामुळे कोंढरी गावाचे आपत्कालीनमधून येथील पाच एकर जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी आमदार संगाम थोपटे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

२५ भोर थोपटे

रिंगरोडवरील पऱ्हर बुद्रुक व शिरगाव येथे दरडी पडून रस्ता बंद झाला आहे. त्याची पाहणी करताना आमदार संग्राम थोपटे व अधिकारी.

Web Title: Rehabilitation of Kondhari pending for two years: Dots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.