कामगार पुतळा रहिवाशांचे पुनर्वसन हडपसर-विमाननगरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:17+5:302021-04-03T04:09:17+5:30
एसआरएच्या कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात प्राधिकरणाचे सचिव सुरेश जाधव, महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ, रवींद्र सावळकर, पुणे महापालिकेच्या परिमंडल दोनचे ...
एसआरएच्या कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात प्राधिकरणाचे सचिव सुरेश जाधव, महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ, रवींद्र सावळकर, पुणे महापालिकेच्या परिमंडल दोनचे उपायुक्त नितीन उदास, पीएमआरडीएच्या उप अभियंता दीपाली वाणी, तहसीलदार विकास भालेराव यांच्यासह १० झोपडीधारक प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थित होते. या सोडतीचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.
लॉटरी प्रक्रियेनुसार झोपडीधारकांना पात्र ठरविण्यात आले. त्यांना लॉटरीमध्ये मिळालेल्या सदनिकांच्या तपशिलासह सर्व माहिती महापालिकेच्या परिमंडळ दोनचे कार्यालय तसेच महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात दिली जाणार आहे. पात्र झोपडीधारकांसोबत संबंधित यंत्रणेने नोंदणीकृत करारनामा केल्यानंतर त्यांना सदनिकांचे रीतसर ताबे देण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामुळे कामगार पुतळा येथील महामेट्रो व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या नियोजित मेट्रो प्रकल्पाचा मार्ग सुकर होणार असल्याचे निंंबाळकर यांनी सांगितले.