मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:04 AM2022-05-25T11:04:04+5:302022-05-25T11:04:23+5:30
मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई सुरू झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भागीदारांचे थेट कसाबपर्यंत संबंध आहेत. त्यांच्या भागीदारांच्या कंपनीनेच पोलिसांना सदोष जाकिटे पुरवली. त्यातच हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई सुरू झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी, मेव्हणे श्रीधर पाटणकर, तसेच मंत्री परब, मुश्रीफ यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेचे नेते असलेले यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती बेनामी म्हणून सरकारी यंत्रणेने घोषित केल्या. त्यांची विमलकुमार अग्रवाल यांच्यासोबत भागीदारी आहे. अग्रवाल यांच्या कंपनीने पोलिसांना बुलेटप्रूफ जाकीट पुरवण्याचे काम घेतले व निकृष्ट जाकिटे दिली. त्यातच हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला.