समुपदेशनातून पुन्हा सोबतीचा करार, ९ हजार ४२९ दाव्यांत तडजोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:21 PM2018-12-26T12:21:23+5:302018-12-26T12:28:55+5:30

बदलेल्या गरजा आणि समजून घेण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे...

relationship once again stand due to counselling, Compromise 9,429 Claims | समुपदेशनातून पुन्हा सोबतीचा करार, ९ हजार ४२९ दाव्यांत तडजोड 

समुपदेशनातून पुन्हा सोबतीचा करार, ९ हजार ४२९ दाव्यांत तडजोड 

googlenewsNext
ठळक मुद्दे कौटुंबिक कलह मिटण्यास ठरतेय फायदेशीरसमुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दुर होण्यास मदतइगो प्रोब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणा-या प्रकरणांची संख्या वाढली

पुणे : कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी घरातील ज्येष्ठांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र त्यांच्याही प्रतयत्नातून कुटुंबियांमध्ये मनोमिलन न झालेल्या प्रकरणात समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशनाच्या माध्यमातून मध्यम मार्ग काढत ६ वर्षात तब्बल ९ हजार ४२९ दाव्यात तडजोड केली आहे. 
   बदलेल्या गरजा आणि समजून घेण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणांवरून देखील सख्ये भाऊ पक्के वैरी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तर पती-पत्नीचे अगदी किरकोळ वाद थेट न्यायालयात पोहोचतात. चांगला स्वयंपाक केली नाही, घरगुती कार्यक्रमात साडी घातली नाही अशा अनेक कारणांवरून झालेले मतभेत थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. तसेच आई-मुले, भाऊ-भाऊ यांच्यातील वादही न्यायालयात पोहोचू लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे न्यायालयात दाखल होणा-या खटल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा खटल्यात समुपदेशन महत्त्वाचे ठरत आहे. समुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दुर होण्यास मदत होत आहे. समुपदेशनामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचत असून, प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होत आहे. विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशानाद्वारे केलेल्या तडजोडीमुळे वादी आणि प्रतिवादी दोन्हीही पक्षकार आनंदी होतात.  
भावांमधील वाद मिटले 
वडोलापार्जीत जमिनीवरून भावांमध्ये वाद होतात. त्यातील काही भाऊ तर अगदी १० ते १४ वर्षे संवादच होत नाही. निकाली काढलेल्या दाव्यांमध्ये अशा प्रकारचे खटले देखील मोठे आहेत. त्यांचे हे अनेक वर्षांचे वाद समुपदेशनातून मिटले आहेत. आयटी क्षेत्राच्या वाढीबरोबर तेथील कलह आणि इगो प्रोब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणा-या प्रकरणांची संख्या वाढली आहे. 

 

वर्ष          दाखल झालेली प्रकरणे   निकाली प्रकरणे 
२०१३           ४५३५                     २७२०  
२०१४           २०२८                     १६४१ 
२०१५           १४५२                       ६६४ 
२०१६          ३७०५                      १४६९ 
२०१७        ५९७९                        १९३५
२०१८         ३०८३                         १००० 
एकुण         २०,८१२                       ९४२९

Web Title: relationship once again stand due to counselling, Compromise 9,429 Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.