पतीच्या मृत्यूनंतर महिलेसोबत प्रेमसंबंध, लग्नास नकार अन् पैसेही लाटले; पोलिसाचे निलंबन

By नितीश गोवंडे | Updated: February 2, 2025 19:15 IST2025-02-02T19:10:33+5:302025-02-02T19:15:13+5:30

तिच्या पतीच्या विम्याचे ५ लाख व सोन्याच्या दागिन्यांचा अपहार

Relationship with woman, refusal to marry; Police officer suspended | पतीच्या मृत्यूनंतर महिलेसोबत प्रेमसंबंध, लग्नास नकार अन् पैसेही लाटले; पोलिसाचे निलंबन

पतीच्या मृत्यूनंतर महिलेसोबत प्रेमसंबंध, लग्नास नकार अन् पैसेही लाटले; पोलिसाचे निलंबन

पुणे : महिलेशी रिलेशनमध्ये राहून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे ५ लाख रुपये व २२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन अपहार केला. त्यानंतर महिलेला मारहाण करून लग्नास नकार देणाऱ्या पोलिस शिपायाविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे जनमानसात पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याकारणाने संबंधित पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. तुषार अनिल सुतार असे या पोलिस शिपायाचे नाव असून, तो खडक पोलिस ठाण्यात नेमणुकीस होता.

या प्रकरणातील फिर्यादी महिला आपल्या पती व मुलासह रास्ता पेठेत राहतात. २०१९ मध्ये त्यांची तुषार सुतार याच्याबरोबर त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. फिर्यादी महिलेला तुषार याने पत्नीबरोबर राहत नाही असे सांगून फिर्यादी यांना सोबत राहण्याबाबत विनंती केली. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला.

फिर्यादी व तुषार यांच्या रिलेशनमध्ये असल्याबाबत तिच्या पतीला समजल्यावर त्याने महिलेला घराबाहेर काढले. तुषार फिर्यादी महिला आणि तिच्या मुलीसह सुमारे तीन वर्षे आंबेगाव येथे एकत्र राहत होते. दरम्यान, फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली. १९ सप्टेंबर २०२१ रोजी या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्याच्या पॉलिसीचे ९ लाख रुपये या महिलेला मिळाले. या पैशांपैकी तुषार याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ५ लाख रुपये व २२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. ते पैसे व दागिने परत न करता त्याचा अपहार केला. या महिलेने लग्नाबाबत विचारले असता तुषार सुतार याने तिला मारहाण व शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याने पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल यांनी तुषार सुतार याला निलंबित केले.

कोथरूड प्रकरणातील आरोपी अजूनही अटक नाही

नऊ जानेवारी रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात एका पीडितेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, दोन वेळा गर्भपात केल्याप्रकरणी दत्तात्रय काळभोर याच्याविरोधात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटले तरीदेखील पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक न केल्याने कोथरूड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Relationship with woman, refusal to marry; Police officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.